Mouth Ulcer | तोंडाच्या अल्सरने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपचार नक्की ट्राय करा!

माऊथ अल्सर अर्थात तोंडाच्या अल्सरमध्ये संपूर्ण जबड्यात पांढरे किंवा लाल ठिपके दिसू लागतात.

Mouth Ulcer | तोंडाच्या अल्सरने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपचार नक्की ट्राय करा!
माऊथ अल्सर अर्थात तोंडाच्या अल्सरमध्ये संपूर्ण जबड्यात पांढरे किंवा लाल ठिपके दिसू लागतात.
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 1:29 PM

मुंबई : कधीतरी तोंडात अल्सर येणे ही अगदी सामान्य समस्या आहे. मात्र, काही लोकांना वारंवार ‘माऊथ अल्सर’ची समस्या येते. अशावेळी संपूर्ण तोंड सोलले गेल्याने खाण्यापिण्यात देखील खूप त्रास होतो. तोंडाच्या अल्सरची अनेक कारणे असू शकतात. मात्र, बहुतेवेळा पोटातील उष्णता, बद्धकोष्ठता, हार्मोनल त्रास आणि मुलींमध्ये मासिक पाळी यांचे मुख्य कारण देखील असू शकते (Home Remedies on Mouth Ulcer).

माऊथ अल्सर अर्थात तोंडाच्या अल्सरमध्ये संपूर्ण जबड्यात पांढरे किंवा लाल ठिपके दिसू लागतात. तोंडाचा अल्सर बरा करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र, हा अल्सर बरा करण्यासाठी आपण घरगुती उपचार देखील वापरू शकता. चाला तर, तोंडाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी असलेल्या या सोप्या टिप्स विषयी जाणून घेऊया…

मध

मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असता,त जे आपल्या तोंडातील अल्सर बरा करण्यास मदत करतात. जर आपल्याला या समस्येतून त्वरित आराम हवा असेल, तर तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी मध लावा. त्यामुळे लवकरच आराम मिळेल.

खोबरेल तेल

नारळाचे तेल अर्थात खोबरेल तेल देखील या समस्येवर खूप फायदेशीर आहे. परंतु, लोक याचा फार कमी वापर करतात. माऊथ अल्सरची समस्या उद्भवल्यास आपण दिवसातून बर्‍याच वेळा त्यावर नारळाचे तेल लावू शकता. अथवा रात्री झोपण्यापूर्वी तोंडाला खोबरेल तेल लावून झोपू शकता. नारळ तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे अल्सरच्या जंतूंचा नाश करण्याचे काम करतात.

मीठाचे पाणी

एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा आणि त्याने गुळण्या करा. हा उपाय आपण दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. या पाण्याने चूळ भरल्यानंतर, साधे पाणी पिऊन तोंडातून मीठाची चव घालवू शकता (Home Remedies on Mouth Ulcer).

लवंग तेल

दातदुखी आणि तोंडातील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी लवंग तेल अतिशय उपयुक्त आहे. अशावेळी  आपण कापसाच्या मदतीने तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी लवंग तेल लावू शकता.

टूथपेस्ट

आपल्या टूथपेस्टमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. तोंडाच्या अल्सरवर टूथपेस्ट लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने व्यवस्थित चूळ भरा. याने तत्काळ आराम मिळेल.

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधातील  औषधी  गुणधर्मामुळे अल्सरमुळे  होणारी  दाहकता  कमी  होण्यास  मदत  होते.  ज्येष्ठमधाच्या काड्या किंवा पावडरच्या स्वरुपात ज्येष्ठमध उपलब्ध असते. ज्येष्ठमधाची काडी असल्यास ती  उगाळून त्याची पेस्ट अल्सरवर लावा. जर तुमच्याकडे ज्येष्ठमधाची पावडर असेल, तर ती मधात एकत्र करून लावा. तसेच ज्येष्ठमधाची पावडर आणि हळद गरम दुधात टाकून ते दिवसातून तीनदा घ्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home Remedies on Mouth Ulcer)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.