Home Remedies । त्वचेवरील रेडनेस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
Home Remedies । त्वचेवरील रेडनेस कमी करण्यासाठी घरगुती उपाय (home remedies to reduce redness on the skin)
मुंबई : खराब जीवनशैली, धूळ आणि प्रदूषण आपल्या चेहऱ्यावर परिणाम करते. कधीकधी क्रिम किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुम आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते. त्वचेच्या अॅलर्जीमुळे चेहऱ्यावर अनेकदा चट्टे राहतात. बर्याच उत्पादनांमध्ये अल्कोहोलची मात्रा अधिक असल्यामुळे चेहऱ्यावर लाल चट्टे येतात. जर तुम्हीही त्वचेवरील रेडनेसमुळे हैराण असाल तर आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोतस ज्याचा वापर करुन तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (home remedies to reduce redness on the skin)
कोरफड
कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेच्या प्रत्येक प्रकारासाठी प्रभावी आहे. कोरफड हा त्वचेचा लालसरपणा कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जर तुम्हाला स्किन रॅशेसमुळे त्वचेला खाज सुटणे आणि जळजळ होत असेल तर कोरफडची जेल चेहऱ्यावर लावा आणि 30 ते 40 मिनिटे ठेवा. यामुळे तुम्हाला खाज आणि जळजळ बंद होईल.
टी-ट्री ऑईल
टी- ट्री ऑईलमध्ये अँटी मायक्रोबियल ओक अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे त्वचेवरील रेडनेसची समस्या दूर करते. त्वचेवरील रेडनेस आणि खाज कमी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे.
विटामिन सी
स्किनकेअर प्रोडक्ट्समध्ये मुख्य सामग्रीमध्ये विटामिन सी असते. बहुतांश लोक विटामिन सी प्रोडक्ट्सचा वापर चमकदार त्वचेसाठी करतात. याशिवाय विटामिन सी मध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे त्वचेवरील रेडनेस कमी करण्यासाठी मदत करतात. विटामिन सी प्रोडक्ट्स लावण्यापूर्वी सनस्क्रीन लावावे.
नाराळाचे तेल
नारळाचे तेल त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर असते. हे चेहऱ्यावर मॉईश्चरायझर म्हणून काम करते जे त्वचेची अॅलर्जी दूर ठेवण्यास मदत करते. त्वचेची खाज आणि लालसरपणा कमी करते. यासाठी एका भांड्यात थोडे नारळाचे तेल घेऊन त्वचेच्या अॅलर्जी झालेल्या भागावर लावा आणि एक तास ठेवा. दिवसातून कमीत कमी 4 ते 5 वेळा लावा. यामुळे स्किन अॅलर्जीपासून सुटका मिळेल. (home remedies to reduce redness on the skin)
Video | Mumbai | वांद्रे-कलानगर जंक्शन उड्डाणपुलाचा एका मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण#Mumbai #BandraKalanagarJunction #Flyover #UddhavThackeray pic.twitter.com/GMt9pq2Zp8
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
इतर बातम्या
गाडीचा FASTag स्कॅन न झाल्यास काय कराल? ही झेरॉक्स जवळ ठेवा अन् फुकट प्रवास करा