मुंबई : आज प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर करण्यासाठी काहीना काही उपाय करत असतो. आपला चेहरा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. याचा एक प्रयोग फार जुन्या काळापासून चालू आहे आणि तो म्हणजे चंदन. अनेक वर्षांपासून लोक चंदनचा वापर करत आहेत. चंदन चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे (Homemade chandan sandalwood face pack for glowing skin).
चंदनाचे लाकूड उगाळण्याचा कंटाळा येत असल्यास, आपण तयार चंदन पावडर देखील वापरू शकता. परंतु, आपल्याला चांगला आणि प्रभावी परिणाम मिळवायचा असेल, तर घरातच चंदन उगाळून ती पेस्ट आपण वापरू शकता. वास्तविक, चंदन केवळ आपला चेहराच सुंदर बनवत नाही, तर आपल्या चेहऱ्यावरील डाग व मुरुम काढून टाकण्यासही फायदेशीर ठरतो.
चंदनाचा वापर कसा करायचा?
आपल्या चेहऱ्याला आणखी त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आणि मुरुमांपासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आपण 5 ग्रॅम चंदनमध्ये 2 ग्रॅम कापूर मिसळू शकता. आता त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला आणि जाड पेस्ट बनवा. आता ही पेस्ट फेस पॅक प्रमाणे आपल्या चेहर्यावर लावा आणि 15 मिनिटे तशीच राहू द्या. पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर, आपण आपला चेहरा साध्या पाण्याने धुवावा.
जर आपल्याला चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे असतील, तर 1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा बदाम पावडर मिक्स करा. या तिन्ही घटकांना चांगले मिसळा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल व मुरुमांपासून मुक्तता मिळेल (Homemade chandan sandalwood face pack for glowing skin).
एका चमचा हळदीमध्ये एक चिमूटभर कापूर मिसळा आणि त्यात चंदन तेल घालून त्याची पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी फेस पॅक प्रमाणे ही पेस्ट चेहर्यावर लावा. सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होईल आणि मुरुमांच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.
एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेस पॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. अप्लाय केल्यानंतर, ते 15 मिनिटे पुरपणे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल, आपल्या चेहर्याची चमक वाढेल आणि मुरुमांपासून मुक्ती मिळेल.
चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी चंदन व गुलाबाच्या पाण्याचे फेसपॅक बनवा. हा पॅक तयार करण्यासाठी, आपण 1 चमचा चंदन पावडर आणि 1 चमचा गुलाब पाणी व्यवस्थित एकत्र मिसळा. याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावा. 10 मिनिटांसाठी ते आपल्या चेहऱ्यावर तसेच राहू द्या. यानंतर 2 मिनिटांसाठी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. कोरड्या टॉवेलने चेहरा पुसून, मग मॉइश्चरायझर लावा.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Homemade Chandan sandalwood face pack for glowing skin)
Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!#strawberry | #skincare | #skincareroutine | #skincaretips https://t.co/K0gUjPPFHn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021