होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क…
हिवाळ्यात अनेक लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला आणि ताप यांच्यासारखे संसर्गाचे आजार होऊ शकतात. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपायांची मदत घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या मदतीने रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवायची?
थंडी सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. हिवाळ्यामध्ये तुम्हाला निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. परंतु तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपचारांची मदत घेऊ शकता. अनेकांना प्रश्न पडला असेल होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊया.
होमिओपॅथी म्हणजे काय?
होमिओपॅथी ही एक प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. होमिओपॅथीमध्ये वनस्पतींसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून औषधे तयार केली जातात. सर्दी, घसा खवखवणे, त्वचारोग यासह अनेक आजारांवर होमिओपॅथीच्या उपचारांचा वापर केला जातो. होमिओपॅथी उपचार नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवते. होमिओपॅथीद्वारे आपण कोणत्या मार्गांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो ते जाणून घेऊया.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ उपाय ट्राय करा
तज्ञांनुसार, हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी औषधांचा वापर करू शकता. होमिओपॅथी औषधांमुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. होमिओपॅथी औषधांमुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्यासारखे संसर्गजण्य आजारांना धोका कमी होतो. त्यासोबतच तुम्हाला जर त्वचेसंबंधीत कोणत्याही समस्या अस्तील तर त्यावर सुद्धा होमिओपॅथी उपचार उपलब्ध आहेत. परंतु नुसत्या औषधांमुळेच नाही तर तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील चांगल्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. दररोज सकाळी तुम्ही नियमित योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होत. त्यासोबतच शरीर देखील निरोगी रहाते. औषधांसोबत पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे असते. निरोगी शरीरासाठी ७ ते ८ तासांची झेप महत्त्वाची आहे. तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. तुमच्या आहारामध्ये जंकफूडचे सेवन जास्त प्रमाणात करू नका.
निरोगी आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
हिवाळ्यात, उबदार कपडे घाला, कोमट पाणी प्या आणि थंड पदार्थ टाळा.
तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, ड्राय फ्रूट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टींचा समावेश करा.
हलका व्यायाम आणि योगासने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.