Heart diseases in women: महिलांनो तब्येत सांभाळा ! मेनोपॉजमुळे होतात हृदयाशी संबंधित आजार; 7 लक्षणे जाणून घ्या !

भारतात आणि जगभरात आज महिलांच्या मृत्यृचे सर्वात कॉमन कारण हृदयरोग (Heart diseases)आहे. अयोग्य जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे हृदयविकाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस आणखी वाढ होताना दिसत आहे. मात्र हे नक्कीच टाळता येऊ शकते. हार्वर्ड हेल्थच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासानुसार, हृदयरोगाच्या प्रकरणात जेंडरच्या हिशोबाने आकलन केल्यास महिलांमधील आजार रोखणं, त्याचं निदान करणं आणि त्यावर […]

Heart diseases in women: महिलांनो तब्येत सांभाळा ! मेनोपॉजमुळे होतात हृदयाशी संबंधित आजार; 7 लक्षणे जाणून घ्या !
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 9:49 PM

भारतात आणि जगभरात आज महिलांच्या मृत्यृचे सर्वात कॉमन कारण हृदयरोग (Heart diseases)आहे. अयोग्य जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे हृदयविकाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस आणखी वाढ होताना दिसत आहे. मात्र हे नक्कीच टाळता येऊ शकते. हार्वर्ड हेल्थच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासानुसार, हृदयरोगाच्या प्रकरणात जेंडरच्या हिशोबाने आकलन केल्यास महिलांमधील आजार रोखणं, त्याचं निदान करणं आणि त्यावर उपचार करण्यास फायदा होतो.

मेनोपॉजपूर्वी (Menopause)महिलांमध्ये इस्ट्रोजनमुळे (Estrogen In Female)चांगले एचडीएल (Good)कोलेस्ट्रॉल वाढते आणि घातक एलडीएल (Bad)कोलेस्ट्रॉल कमी होते, ज्यामुळे हृदयविकारापासून वाचण्यास मदत होते. थोडक्यात, रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची (HDL Cholesterol) पातळी जास्त आणि घातक कोलेस्ट्रॉलची (LDL Cholesterol)पातळी कमी ठेवण्याचे महत्वपूर्ण काम इस्ट्रोजेन करत असते. मात्र मेनॉपॉजनंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमधील कोलेस्ट्ऱॉलच्या एकूण मात्रेत घट होते. पण मेनोपॉज हे हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याचे एकमेव कारण ठरू शकत नाही. त्यासाठी इतरही काही घटक कारणीभूत असतात.

स्त्रिया करतात आरोग्याकडे दुर्लक्ष

नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कार्डिॲक सायन्सेसचे चेअरमन डॉ. अजय कौल यांनी टीव्ही9 शाी संवाद साधत महिलांमधील हृदयरोगाशी संबंधित आजारांबाबत माहिती दिली. महिलांमधील वाढत्या हृदयरोगांना त्या स्वत: जबाबदार आहेत. कारण त्या आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत, दुर्लक्ष करतात. वयाची पंचेचाळीशी गाठल्यानंतर पुरुष आणि महिलांमधील हृदयरोगाचा त्रास एकसारखा असतो असं काही महिलांना वाटतं. मात्र, तसं मानणं चुकीचं आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी आहे, असं कौल म्हणाले. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयरोगाची लक्षणे वेगळी असतात. छातीत दुखणे, घाबरणे, हार्टबर्न सारखी सामान्य लक्षणे साधारणपणे पुरुषांमध्ये असतात. तर महिलांमध्ये जवळपास ही लक्षणे नसतातच, असंही त्यांनी सांगितलं.

महिलांमधील हृदयरोगाची सात लक्षणे :

1. थकवा

2. जेवणानंतर असहज वाटणे

3. जबड्यात आणि पाठीत विचित्रं पद्धतीने दुखणे

4. उजव्या आणि डाव्या हातात वेदना होणे

5. शिडी चढताना धाप लागणे, विशेष करून जेवल्यावर

6. जेवल्यानंतर पोटात दुखणे किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखणे, हे हृदयाशी संबंधित कारण असू शकते

7. अचानक घाम येणे

डॉ. कौल यांच्या मते, या सर्व समस्या महिलांमध्ये हृदयाशी संबंधित आजाराचे संकेत देतात. हृदयरोगाची तपासणी, उपचार पुरुष आणि महिलांमध्ये समान असतो.

मेटाबॉलिक सिंड्रोममुळे मृत्यूचा धोका

या अभ्यासातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कमरेचा वाढता आकार, उच्च रक्तदाब, ग्लुकोजमधील चढउतार, लो एचडीएल कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराइड्स आदींमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका वाढतो, असं अभ्यासातून समोर आलं आहे. विशेष करून कमी वयाच्या महिलांना हृदयविकार येण्यास मेटाबोलिजम सिंड्रोम कारणीभूत असतो. एका अभ्यासानुसार, बायपास सर्जरी करणाऱ्या रुग्णांमध्ये आठ वर्षाच्या आत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मेटाबोलिक सिंड्रोममुळे मृत्यूचा धोका अधिक असतो.

मधुमेहामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक असतो. त्यामुळेच कदाचित मधुमेह असलेल्या महिलांमध्ये स्थुलता, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक दिसते. साधारणपणे पुरुषांच्या तुलनेत महिलांना 10 वर्षानंतर हृदयविकाराचा धोका उद्भवतो. मात्र, मधुमेहामुळे हा धोका कधीही निर्माण होऊ शकतो. ज्या महिलांना हार्ट अॅटॅक येऊन गेला असेल, त्यांना मधुमेहामुळे हृदयविकाराच्या दुसऱ्या झटक्यावेळी धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांचं हार्ट फेल होऊ शकतं.

त्रास कमी करण्यासाठी टिप्स

1. वयाची 30-35शी ओलांडल्यानंतर महिलांनी काही बेसिक चाचण्या करायला हव्यात. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे की नाही याची माहिती मिळते. त्याशिवाय झोपेच्या पॅटर्नमध्ये काही त्रुटी तर नाही, काही बदल तर नाही ना याचीही माहिती घेणं आवश्यक आहे.

2. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी आरोग्याची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना वेळेवर झोप घेता येत नाही. रात्रभर काम केल्याने सकाळी झोपल्यावर त्यांना हृदयाशी संबंधित विकार जडण्याची भीती अधिक असते.

3. मधुमेह असलेल्या महिलांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारखे आजार सायलंट किलर असतात. जोपर्यंत वैद्यकीय चाचण्या करत नाही, तोपर्यंत कोणत्याही महिलेल्या आपलं आरोग्य बिघडल्याचं समजत नाही. मधुमेहामुळे केवळ किडनी आणि यकृतावर परिणाम होत नाही तर त्यामुळे हृदयावरही परिणाम होत असतो.

4. वजन कमी होऊ देऊ नका. जंक फूड, पॅकबंद पदार्थ आणि मिठाई खाऊ नका

5. अनेक महिला ॲंग्झाईटी किंवा तणावामुळे पुरेशी झोप घेत नाहीत. त्यामुळे त्या तणावाखाली येतात. त्यामुळे व्यग्रता किंवा चिंता दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

नियमितपणे आरोग्य तपासणी करा

महिलांनी नियमितपणे आरोग्य तपासणी केली पाहिजे, असा सल्ला डॉ. कौल यांनी दिला आहे. वयाची चाळीशी गाठल्यानंतर स्त्रियांनी आपला प्रोफाईल- लिपिड, ब्लड शुगर, केएफटी आणि एलएफटीची तपासणी केली पाहिजे. कुटुंबात हृदयाशी संबंधित आजाराची हिस्ट्री असेल तर महिलांनी हृदयरोग तज्ज्ञांकडून तपासणी केली पाहिजे. डॉक्टर कौल यांच्या म्हणण्यानुसार, हार्मोनल चेंजेस आणि मोनोपॉज दोन्ही याची मुख्य कारणे आहेत. कारण अशाप्रकारच्या त्रासाची सरासरी 1:1 असते. या शिवाय ब्रोकन हार्ट सिंड्रोमसारख्या गोष्टीही असतात. याचा सर्वाधिक महिलांवर परिणाम होतो. त्यामुळे अधिक तणाव निर्माण होतो. त्यामुळे त्यांचं हृदय हा तणाव झेलण्यास असमर्थ ठरते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.