रूम किंवा हॉटेल बुक करताना काय चेक कराल? तुमच्या पर्सनल…

रूम किंवा हॉटेल बुक करताना झालेली छोटीशी चूकही मोठी समस्या निर्माण करू शकते. तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या रुम किंवा हॉटेल बुक करताना नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.

रूम किंवा हॉटेल बुक करताना काय चेक कराल? तुमच्या पर्सनल...
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 9:00 PM

आपण कुठेतरी लांब फिरायला जाताना किंवा प्रवास करताना सर्वप्रथम राहण्यासाठी जागा शोधतो. म्हणजे त्या ठिकाणी कोणते चांगले हॉटेल आहे का? त्यांच्या काय सोयी सुविधा आहेत हे सर्व तपासून पाहतो. यासाठी वेबसाईट्स आणि ॲप्सद्वारे त्याची चौकशी करतो आणि आवडल्यास लगेच ऑनलाईन बुकही करून टाकतो. मदत घ्यावी लागते. पण असे करणे तुम्हाला कधीतरी महागात पडू शकते. जर त्याबद्दल योग्य ती काळजी घेतली नाही तर.

बनावट वेबसाइट आणि ॲप्सपासून सावध रहा

ऑनलाईन रूम किंवा हॉटेल बुक करताना अतिशय सावधानता बाळगणे गरजेचं असतं. अन्यथा मोठी अडचण निर्माण होऊ शकते. कारण ऑनलाईन फ्रॉडच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. आपण जर सावधानता बाळगली नाही तर आपणही त्याचे शिकार होऊ शकतो.

डिजिटल फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक वेबसाइट्स आणि ॲप्स असे आहेत ज्या कमी किमतीत खोल्या किंवा हॉटेल्स देण्याचे आश्वासन देतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचे सत्य काही वेगळेच आहे. येथे जास्त सवलतीचे आमिष दिले जाते आणि आधी पैसे भरण्याची अटही असते. अशा परिस्थितीत काही लोक लोभापायी फसतात आणि पैसे भरतात. तर असे करणे योग्य नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही रूम किंवा हॉटेल बुक करता तेव्हा वेबसाइट आणि ॲप काळजीपूर्वक तपासा.

कोणत्याही ॲप किंवा वेबसाइटबद्दल तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याबद्दलचे रिव्ह्यू वाचणे. तसेच, वेबसाइटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवणे हे गरजेचे आहे.

मूळ कागदपत्रे देणे टाळा

कोणत्याही हॉटेलमध्ये चेक इन करताना आधार कार्ड विचारले जाते, परंतु अशा परिस्थितीत तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड वापरू शकता. मास्क केलेले आधार कार्ड सर्व व्हेरिफिकेशन हेतूंसाठी वापरले जाऊ शकते. तसेच त्यात बहुतांश सुरक्षा तपशील नसतात आणि ते सर्वत्र वैध देखील आहे. जर मास्क केलेले आधार कार्ड स्वीकारत नसेल तर तक्रार करता येते. खरा आधार देण्यात धोका आहे. कारण बँकेसह अनेक महत्त्वाचे तपशील त्याच्याशी जोडलेले असतात.

माहिती ऑनलाईन शेअर करण्यापूर्वी ती वेबसाइट तपासा

तुमच्या आधारकार्डचा किंवा कणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा तपशील ऑनलाईन टाकण्यापूर्वी ती वेबसाइट किंवा ॲपची विश्वासार्हता तपासणे महत्त्वाचे आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती बनावट साइटवर गेल्यास, तिचा गैरवापर होऊ शकतो. तसेच, माहिती भरून झाल्यावर किंवा ऑनलाईन बुकींगवेळी कोणीही OTP मागितला तर तो देणे टाळा. असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

या सर्व गोष्टींचे पालन करणे आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. अन्यथा आपल्याला यामुळे आयुष्यभराचं नुकसान सहन करावं लागू शकत.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....