बदलत्या ऋतूमानाशिवाय या कारणांमुळेही लहान मुलांना होऊ शकतो ॲलर्जीचा त्रास, करून पहा ‘हे’ उपाय

लहान मुलं ही मोठ्या माणसांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीची ॲलर्जी पटकन होऊ शकते व त्याचा त्रासही अधिक होऊ शकतो. या ॲलर्जीबद्दल जाणून घेणे व त्यावरील घरगुती उपाय माहीत असणे, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे असते.

बदलत्या ऋतूमानाशिवाय या कारणांमुळेही लहान मुलांना होऊ शकतो ॲलर्जीचा त्रास, करून पहा 'हे' उपाय
बदलत्या ऋतूमानाशिवाय या कारणांमुळेही लहान मुलांना होऊ शकतो ॲलर्जीचा त्रास, करून पहा 'हे' उपायImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 9:42 AM

Types of allergy in kids : लहान मुलांना एखाद्या गोष्टीची ॲलर्जी (Allergy in Kids) होणं ही खूप सामान्य बाब आहे. लहान मुलं ही मोठ्या माणसांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह (Sensitive) असतात. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीची ॲलर्जी पटकन होऊ शकते व त्याचा त्रासही अधिक होऊ शकतो. मात्र दिलाशाची बाब ही की त्यांना होणारी ॲलर्जी ( बहुतांश वेळेस) खूप गंभीर नसते व त्यामुळे ते त्यातून पटकन बरेही होतात. या पैकी बरीचशी ॲलर्जी घरगुती उपायांनी (home remedies to cure) बरी होऊ शकते. मात्र घरगुती उपायांनाही बरे न वाटल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन योग्य औषधोपचार सुरू करावेत. मुलांना सामान्यत: कोणकोणती ॲलर्जी होते आणि त्यावर कोणते उपाय करता येतील, याबाबत जाणून घेऊया.

सीजनल ॲलर्जी :

वातावरणातील बदल, धूळ, माती आणि घाण यामुळे ही सीझनल ॲलर्जी होते. या ॲलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी ॲंटी हिस्टामाइन, आय ड्रॉप, ॲलर्जी शॉट इत्यादी गोष्टींचा वापर करू शकतो.

स्किन ( त्वचेची) ॲलर्जी :

काही मुलांची स्किन अतिशय संवेदशनशील (Sensitive) असते. त्यांच्या शरीराला सूट होणार नाही, अशा काही वस्तू किंवा पदार्थांचा वापर ( उदा. प्रिझर्व्हेटिव, मेटल) झाल्यास त्यांना या ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. ही ॲलर्जी बरी करण्याचा उपाय म्हणजे, ॲलर्जीग्रस्त भागावर बर्फाने (ice pack)शेक देणे. तसेच कॉटनचे कपडे घातल्यानेही आराम मिळू शकतो. कोमट पाण्याने मुलांना स्नान घालावे.

हे सुद्धा वाचा

फूड ॲलर्जी :

काही मुलं सर्व पदार्थ खाऊ शकत नाहीत. काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकते. उदा. अंडी, दूध किंवा सोया इत्यादी. एखादा पदार्थ चुकून खाल्ला गेल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. मात्र या कारणामुळे झालेली ॲलर्जी बरी करण्यासाठी एखादे निश्चित , ठोस औषध नाही. ॲलर्जीपासून वाचवण्याचा उपाय म्हणजे, ज्यामुळे त्रास होतो, असे पदार्थ मुलांना खाऊच देऊ नये. जास्त त्रास होऊ लागल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

पाळीव प्राण्यांची ॲलर्जी :

काही मुलांना पाळीव प्राण्यांची ॲलर्जी असते. प्राण्यांचे केस अथवा शरीराच्या इतर भागांच्या संपर्कात मुले आल्यासा त्यांच्यामध्ये ॲलर्जीची लक्षणे दिसू लागतात. यापासून वाचण्याचा उत्तम उपाय म्हणजे, मुलांना प्राण्यांपासून दूर ठेवणे.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.