तुमच्या स्किन टोननुसार या पद्धतीने निवडा लिपस्टिक शेड
मेकअपमध्ये लिपस्टिक महत्त्वाची असते. हे लावल्यानंतर तुमचा पूर्ण लूक इंहांस होतो. पण लिपस्टिकची शेड बरोबर नसेल तर ती तुमचा लूक खराब करू शकते. तुमच्या स्किन टोन नुसार परफेक्ट लिपस्टिक शेड कसा निवडायचे हे जाणून घ्या.
प्रत्येक महिलेला माहीतच आहे कि लिपस्टिक शिवाय मेकअप पूर्ण होऊच शकत नाही. कारण लिपस्टिक हा मेकअपचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यातच आपण पाहतो कि मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या लिपस्टिक शेड आल्या आहेत. त्यामुळे अनेक महिला कंफ्युज होत असतात कि नेमकी कोणती शेड आपल्या त्वचेवर सूट होईल. कारण सध्या न्यूड शेड खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्वचेसाठी कोणत्या लिपस्टिक शेड्स आवश्यक असू शकतात.
गोऱ्या त्वचेसाठी लिपस्टिक शेड
गोरी त्वचा असलेल्यांसाठी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी मऊ गुलाबी, पीच न्यूड आणि हलक्या कोरल शेड्स असलेल्या लिपस्टिकची निवड करा जेणेकरून तुमच्या त्वचेच्या टोनवर परिणाम होणार नाही.
डस्की त्वचेसाठी लिपस्टिक शेड
डस्की स्किन असलेल्यांसाठी ब्राऊन आणि बेरी, कॅरमेल टोन आणि माऊव्ह शेड तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. हे रंग नैसर्गिक अंडरटोनवर परिणाम न करता तुमच्या ओठांना चमक देतात. अतिशय हलक्या किंवा पेस्टल शेड्स टाळा कारण ते ओठांवर चांगले दिसणार नाहीत.
सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिक शेड
सावल्या स्किनसाठी हलक्या रेड, प्लम आणि बेरी टोन सारख्या बोल्ड आणि रिअल शेड्स असलेल्या लिपस्टिकचा वापर करू शकतात . जे नैसर्गिक रंग वाढवतात. हे रंग एक कॉन्ट्रास्ट आहेत जे ओठांना चांगले चमकवतात.
गडद त्वचेसाठी लिपस्टिक शेड
गडद त्वचेसाठी बरगंडी, चॉकलेट ब्राऊन आणि पीच सारख्या गडद शेड असलेल्या लिपस्टिक चांगल्या उठून दिसतील. तुम्ही हलके तपकिरी आणि बेरी शेड्स सुद्धा वापरू शकता.
आपल्या स्किन टोन नुसार योग्य लिपस्टिक निवडण्यासाठी तुम्ही तुमच्या बोटांचा वापर करू शकता. तसे तर बरेच लोक लिप शेड निवडण्यासाठी हाताच्या मागे रंग चेक करतात. पण जेव्हा हा रंग ओठांवर लावला जातो तेव्हा तो अजिबात चांगला दिसत नाही. हेच कारण आहे की, तुम्ही बोटांवर लिपस्टिक शेड लावून ट्राय केले पाहिजे. कारण बोटांचा रंग बऱ्याच प्रमाणात तुमच्या स्किनशी जुळतो.