लठ्ठपणामुळे त्रस्त? आहारात करा ‘हे’ 4 बदल, जाणून घ्या

लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांना असे वाटते की वाढलेले वजन कमी करणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. त्यातही पोटावर साठलेली फॅट कमी करणे सर्वात अवघड मानले जाते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला डाएटशी संबंधित काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास खूप मदत होते.

लठ्ठपणामुळे त्रस्त? आहारात करा 'हे' 4 बदल, जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी या टिप्स महत्त्वाच्या
Follow us
| Updated on: Dec 28, 2024 | 5:39 PM

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे व नियमित योग्य आहार न घेणे तसेच जंक फूडचे अधिक सेवन करणे यामुळे अनेकांना लठ्ठ पणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच ज्यांना ही समस्या सतावत आहे ती लोकं वजन कमी करत आहेत त्यांना त्यांच्या पोटातील फॅटची जास्त चिंता असते, कारण पोटावर असलेले फॅट कमी करणे सर्वात कठीण असते. त्याचबरोबर वाढत्या फॅट मुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कारण पोटावर फॅट जमा झाल्याने तुमच्या शरीरातील लिवर आणि किडनीवर यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. हेच कारण आहे की डॉक्टर पोटतील फॅट त्वरित कमी करण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या या डाएट हॅक्सचा अवलंब करावा. चला जाणून घेऊया या डाएट टिप्सबद्दल सविस्तर.

वजन कमी करण्यासाठी डाएट हॅक

वजन कमी करणारे ड्रिंक्स

हे सुद्धा वाचा

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी हर्बल चहाचे सेवन करावे. दररोज सकाळी हर्बल चहा प्यायल्याने तुमचे चयापचय वेगवान होते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास खूप मदत होते. यासाठी तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक टी सारख्या कोणत्याही प्रकारचा चहाचे सेवन करू शकतात.

नाश्त्यामध्ये नटसचे सेवन करा

आपण प्रत्येकजण रोज सकाळी पोटभरून नाश्ता करत असतो. नाश्ता करताना अनेकांना चमचमीत तसेच टेस्टी नाश्ता करण्याची सवय असते. त्याच बरोबर तुम्ही रोज नियमित नटसचे सेवन करा . कारण याच्या सेवनाने तुमचे वजन खूप कमी होऊ शकते. नटसमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते. जेणेकरून तुम्ही जास्त भूक लागत नाही. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये बदाम, अक्रोड, काजू आणि मनुका यांसारख्या ड्रायफ्रूट्सचा समावेश करू शकता.

सकाळी नाश्त्यात फळांचे सेवन करा

दररोज सकाळी नाश्त्यामध्ये हंगामी फळाचा समावेश अवश्य करावा. त्यासोबत तुम्हाला हवं असलेल्या तुमच्या आवडीनुसार फळांची निवड करू शकता. पण तुम्ही अशा फळाची निवड करा ज्यात फायबर भरपूर प्रमाणात असेल. यासाठी तुम्ही सफरचंद किंवा डाळिंब निवडू शकता.

या पदार्थांचे सेवन करू नका

वजन कमी करण्यासाठी खाद्यपदार्थांची निवड करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच खाद्यपदार्थांचा त्याग करणंही तितकंच गरजेचं आहे. तुमच्या आहारात साखर, पांढरे मीठ आणि पीठ यासारख्या गोष्टींपासून तयार केलेल्या पदार्थांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. असे केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणत्याच अडचणी येणार नाही तसेच जलद गतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.