Homemade Soap | चमकदार, निरोगी त्वचा हवीय? घरच्या घरी बनवा केमिकलमुक्त साबण…

| Updated on: Jan 21, 2021 | 1:30 PM

केमिकलयुक्त साबणांचा वापर टाळण्यासाठी आपण घरच्या घरी नैसर्गिक साबण बनवू शकता.

Homemade Soap | चमकदार, निरोगी त्वचा हवीय? घरच्या घरी बनवा केमिकलमुक्त साबण...
Follow us on

मुंबई : त्वचा निरोगी राहावी आणि नितळ दिसावी म्हणून आपण सर्वजण आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या साबणांचा वापर करतो. आजकाल साबणांऐवजी लोक बॉडी वॉश आणि शॉवर जेल सारख्या उत्पादनांचाही वापर करतात. अनेकदा लोक आपल्या त्वचेचा पोत लक्षात न घेता कोणताही साबण वापरतात. बाजारात मिळणारे महागडे साबणच आपल्या त्वचेवर गुणकारी ठरतील, असे अनेकांना वाटते. मात्र, बाजारात असे अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत, ज्यामुले आपल्या त्वचेला हानी देखील पोहोचू शकते (How to make chemical free homemade soap).

रासायनिक साबण वापरल्याने त्वचेवर अॅलर्जी आणि पुरळ होऊ येऊ शकते. अशा प्रकारच्या साबणाचा सतत वापर केल्याने तुमची त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. अशावेळी या केमिकलयुक्त साबणांचा वापर टाळण्यासाठी आपण घरच्या घरी नैसर्गिक साबण बनवू शकता. चला तर, घरच्या घरी केमिकल फ्री साबण कसा तयार करायचा याबद्दल जाणून घेऊया…

नैसर्गिक साबण तयार करण्यासाठी आवश्यक घटक

– ग्लिसरीन बेस साबण

– कडुलिंबाची पाने

– दोन चमचे साखर

– व्हिटामिन ई कॅप्सूल

– साबणाला आकार देण्यासाठी मोल्ड किंवा लहान वाटी

(How to make chemical free homemade soap)

साबण तयार करण्याची कृती

सर्वप्रथम, कडूनिंबाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे पाणी आणि कडूलिंबाची पाने घेऊन, त्याची पेस्ट बनवा. यानंतर एका भांड्यात ग्लिसरीन बेसचा साबण घेऊन ‘डबल बॉईल मेथड’ने साबण वितळवून घ्या. मंद आचेवर वितळवलेले ग्लिसरीन साबणचे तुकडे असलेल्या भांड्यात आता कडुलिंबाच्या पानाची पेस्ट घाला. हे साबणाचे मिश्रण चांगले मिसळा. नंतर गॅस बंद करा आणि साबणाचे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. नंतर त्यात व्हिटामिन ईची एक कॅप्सूल घाला.

साबणाची वडी कशी बनवावी?

साबणाची वाडी तयार करण्यासाठी पेपर कट आणि लहान वाटी किंवा मोल्ड वापरला जाऊ शकतो. या मोल्डमध्ये साबणाचे मिश्रण ओतून काही तास तसेच थंड होऊ द्या. याव्यतिरिक्त आपण फ्रीजचा वापर करून साबण पटकन तयार करू शकता. हे होममेड साबण आपण त्वचेसह चेहऱ्यावर देखील वापरू शकता.

कडुलिंबाचे फायदे

कडूलिंबाची पाने आपल्या त्वचेसाठी विशेषतः चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कडुलिंबाची पाने चेहर्‍यावरील मुरुम आणि पिटकुळ्या काढून टाकण्याचे काम करते. जर आपल्याला हवे असेल, तर आपण घरीच कडुलिंबाची पाने, हळद आणि गुलाबपाण्यापासून फेस पॅक बनवू शकता.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी अथवा वापरापूर्वी सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(How to make chemical free homemade soap)

हेही वाचा :