Eco Friendly Makhar | घरच्या घरी असं बनवा गणपतीसाठी इको फ्रेंडली मखर, आतापासून अशी करा तयारी

गणपती बाप्पासाठी आपण पर्यावरणाला कोणताही त्रास किंवा बाधा न आणता मखर बनवण्याचा विचार करत असाल, तर ही नक्कीच निसर्ग संवर्धनासाठी ही नक्कीच चांगली बाब आहे, आणि गणपती बाप्पाची अशी ही मखर सजावट सर्वांना आवडते.

Eco Friendly Makhar | घरच्या घरी असं बनवा गणपतीसाठी इको फ्रेंडली मखर, आतापासून अशी करा तयारी
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:41 PM

मुंबई : 31 ऑगस्ट 2023 | गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर बनवण्याची कल्पना असेल, तर त्यावर आधीपासूनच कामाला सुरुवात करा, नाहीतर नंतर फार कमी वेळ हातात राहिलेला असतो, तेव्हा काहीतरी पटकन करण्याच्या नादाने एक हटके डेकोरेशन आपल्या गणपती बाप्पासाठी करणे राहून जातं.खरंतर तुम्ही सर्वात आधी डोळ्यासमोर आणा की तुम्हाला गणपती बाप्पासाठी कसं मखर किंवा डेकोरेशन हे डोळ्यासमोर येत आहे. आधी तुमच्या कल्पना कागदावर उतरवा, कागदावर उतरवा या शब्दाचा अर्थ नक्कीच लिहून काढणे असा नाहीय. तर साधी सुधी का असेना एक आकृती स्वरुपात ढोबळ मानाने कल्पना कागदावर उतरवा.

इको फ्रेंडली डेकोरेशन करताना तुम्हाला नक्कीच थर्माकॉलचा वापर करायचा नाहीय. थर्माकॉल किंवा इतर अर्नेसर्गिक किंवा प्लास्टिकचा वापर करुन तयार केलेलं मखर शोभून दिसत नाही. एक नीट लक्षात असू द्या, डेकोरेशन करताना त्याला टाकाऊ किंवा न वापरता असलेल्या वस्तूंपासून हे डेकोरेशन तयार केलेले आहे, हे वाटू नये म्हणून शेवटी त्यावर खूप लक्ष केंद्रीत करा, ज्याला आपण फिनिशिंग टच म्हणतो. तुम्हाला हे फिनिशिंग टच रंग पेटीच्या माध्यमातून, पोस्टर कलर्स वापरुन नीट रंगवता येतील. कागद आणि पुठ्ठे यांचा वापर नीट करता यायला हवा, यांना एक रिच लूक देण्यासाठी पोस्टर्स कलर्स वापरा.

तुम्ही आर्टस म्हणजे कला क्षेत्रात पारंगत नसाल, तर या क्षेत्रात किंवा ज्याची चित्रकला चांगली आहे, अशा मित्राची मदत घ्या, तुमच्यासाठी काम सोपं होईल. पुठ्याचं झाड किंवा कागदाची पानं केली, तर ती रंगवण्यासाठी, रंगसंगती किंवा ते झाडं वाटलं पाहिजे, कागद दुमडून झोपडीचे कौलं करता येतील, त्याला तपकीरी रंग कसा आणि कशी शेड देता येईल हे तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीने समजून घ्या. बाहेरुन लाईटस कसे देता येतील .या वेळी शॉक किंवा एखादी वस्तू तापून किंवा शॉर्ट सर्किंट होवून आग लागणार नाही, याची देखील पुरेपूर काळजी घ्या. डेकोरेशन करताना कापडाचा वापर करायचा असेल, तर खादी किंवा सुती कापडाच्या प्लेन किंवा काटपदराच्या साड्यांचा वापर करा. तुम्ही कॉटनच्या साडीचा वापर केला तर त्याला आणखी रिचनेस येतो.

गणपतीची मूर्ती केवढी असेल, मूर्ती ठेवल्यानंतर त्याला किती उंची दिली जाईल, कुठे कोणत्या रंगाचा कागद वापरला जाईल, त्याला दुमडून डिझाईन कशी बनवली जाईल, वेगवेगळ्या रंगाचे कागदं वापरुन त्याची शोभा कशी वाढवता येईल. साधारण ३ च्या आत रंगसंगती, म्हणजेच मखर सजवताना ३ पेक्षा जास्त रंग वापरले नाहीत, तर ते छान दिसतं, पण जास्त रंग वापरले तर बटबटीत दिसतं, हे टाळण्यासाठी कमी रंगांची योग्य ती रंगसंगती वापरा, खूप कमी वेळेत, साधी, पण शोभून दिसणारी सजावट तुम्हाला करण्यास मदत होईल. याआधी आपल्याला कोणत कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, याची यादी बनवा, कारण डेकोरेशनचं काम सुरु असताना, मध्येच बाजारात जावून वेळ जास्त जातो आणि मखर – डेकोरेशनला जास्त उशीर होतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.