थंडीच्या दिवसांत घरच्या घरीच बनवा ‘दही’, ‘या’ टिप्स पडतील उपयोगी…

बाजारातून दही विकत घेण्यापेक्षा काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी उत्तम दही तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया या पद्धतींबद्दल...

थंडीच्या दिवसांत घरच्या घरीच बनवा ‘दही’, ‘या’ टिप्स पडतील उपयोगी...
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 10:47 AM

मुंबई : मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी खिचडी खाण्याची प्रथा आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांत खिचडी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी मुगाची खिचडी, तर काही ठिकाणी उडीद डाळ घालून काळी खिचडी बनवली जाते. या खिचडीसोबत दही खाण्यास दिले जाते. मात्र, यंदा थंडीचा कडाका वाढल्याने सध्या दही बनवणे अर्थात विरजण लावणे कठीण झाले आहे. वाढत्या थंडीमुळे दही नीट बनत नाही. अशावेळी बाजारातून दही विकत घेण्यापेक्षा काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी उत्तम दही तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया या पद्धतींबद्दल… (How to make perfect curd at home in winter)

अशा प्रकारे बनवा दही :

दही तयार करण्यासाठी नेहमी ‘फुल क्रीम’ दुधाचा वापर करा. दही लावण्यासाठी दूध मातीच्या जाड मटका किंवा हांडीमध्ये साठवा. कारण, या भांड्यात उष्णता जास्त काळ राहते. भांड्यात टाकण्यापूर्वी प्रथम ते दूध चांगले उकळवा. पुन्हा थंड होऊ द्या. दूध कोमट झाल्यावर त्यात थोडे ताजे दही घाला. यासाठी साधारण एक किलो दुधात एक चमचा दही टाकू शकता. या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्या.

यानंतर त्यात अक्ख्या हिरव्या मिरच्या देठासकट घाला. यानंतर, हांडी अशा ठिकाणी ठेवा जिथे ती जास्त वेळ गरम राहील. यासाठी आपण गरम चपात्या बनवण्याच्या ठिकाणी, किंवा जेवण बनवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता. हे भांडे लोकरीच्या कपड्यात गुंडाळून पिठाच्या डब्यात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकता.

तुमच्या घरी मायक्रोवेव्ह असेल, तर हे भांडे दोन मिनिटांसाठी गरम करून घ्या, नंतर भांडे नीट बंद करून ठेवा. एकदा हंडी सेट झाली की भांडे पुन्हा हलवू नये, ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा. ही दह्याचे भांडे सुमारे 8 ते 10 तास असेच ठेवून द्या. यासाठी आपण रात्रीच्या वेळी दह्याचे विरजण लावून ठेवू शकता. याप्रमाणे सकाळपर्यंत दही व्यवस्थित तयार होईल (How to make perfect curd at home in winter).

या गोष्टी लक्षात ठेवा :

– विरजण गरम दुधात घाऊ नका, त्यामुळे दही पातळ आणि चवीला आंबट होईल.

– तुम्ही वापरत असलेले विरजण आंबट नसल्याची खात्री करा.

– ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करता त्यात दही लावू नका.

– हिवाळ्यात दही बनव्यासाठी तुम्हाला जास्त विरजण लागेल. त्याचबरोबर उन्हाळापेक्षा हिवाळ्यात दही बनण्यासाठी वेळही जास्त लागतो.

– दूध घालण्याआधी विरजण नीट फेटून घ्या. त्यामुळे दही नीट बनेल नाहीतर गुठळ्या तयार होतात.

– दूध अतिशय थंड किंवा गरम असू नये. त्यामुळे दही पातळ आणि लिबलिबीत होईल.

– दही बनल्यावर ते फ्रिज मध्ये ठेवा. जास्त वेळ उघडे ठेऊ नका, त्यामुळे ते आंबट होईल.

– घरी बनवलेले दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नका.

(How to make perfect curd at home in winter)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.