शुद्ध रक्तासाठी ही चटणी आहे खूपच फायद्याची, जाणून घ्या संपूर्ण रेसीपी
हिवाळ्यात हिरव्या ताज्या पालेभाज्या बाजारात येत असतात. कोथिंबिरीच्या पानापासून आंबट-मसालेदार चटणी बनवून जेवणाची चव वाढवता येते, त्याच बरोबर या चटणीच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदे देखील होतात.
थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. त्यात हंगामी भाज्यांचे या दिवसात आहारात समावेश करून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण हंगामी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने कोणतेही आजारांचा संसर्ग होत नाही. यासाठी तुमच्या आहारात कोथिंबिरपासून बनवलेल्या चटणीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे तुमच्या रक्तातील घाण काढून टाकण्यास देखील खूप उपयुक्त ठरते. कोथिंबिरीपासून आंबट-मसालेदार चटणी बनवून तुमच्या जेवणाची देखील चव वाढवता येते तर मग जाणून घेऊया चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
कोथिंबीर – बारीक चिरलेली
लसूण – ४-५ पाकळ्या
आलं – १ इंच तुकडा
हिरव्या मिरच्या – ३ ते ४
शेंगदाणे – १ वाटी
लिंबाचा रस- अर्धी वाटी (४ चमचे)
मीठ- आवश्यकतेनुसार
कृती
चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजारातून ताजी कोथिंबिरी आणून ते नीट धुवून कापून घ्यावेत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालून बारीक वाटून घ्या. यानंतर कोथिंबिरीची चटणी तयार होईल. ही चटणी तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.
कोथिंबिरीच्या चटणीचा सुगंध आणि चव दोन्ही अतुलनीय आहेत. ही चटणी तुम्ही तळलेले पदार्थ, भात किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. कोथिंबिरीची पाने केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. तज्ज्ञांच्या मते, कोथिंबिरीमध्ये असे घटक असतात जे रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. तसेच या चटणीच्या सेवनाने जेवणाची टेस्ट तर वाढेलच, सोबतच शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतील. यूरिक अॅसिडची समस्या असणाऱ्या लोकांनी ही चटणी रोज चपाती किंवा पराठ्यांसोबत सेवन करावी. या चटणीने यूरिक अॅसिडमुळे वाढलेली हात-पायांवरील सूजही कमी होते.