घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मार्केटपेक्षा चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस…रेसीपी नक्की वाचा

आपल्यामधील अनेकांना थेपल्यांसोबत किंवा पराठ्यांसोबत सॉस खाण्याची आवड असते. परंतु मार्केटमधील सॉसमध्ये भरपूर प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं टोमॅटो सॉस कसा बनवायचा. या सॉसमुळे तुमच्या आरोग्याला कोणत्यही प्रकारची इजा होणार नाही.

घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मार्केटपेक्षा चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस...रेसीपी नक्की वाचा
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 8:41 PM

आजकाल मार्केटमध्ये अनेक ब्रँडचे टोमॅटो सॉस उपलब्द आहेत. परंतु बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो सॉसमध्ये अनेक प्रक्रिया केलेले घटक वापरले जातात. मार्केटमधील टोमॅटो सॉस त्याच्यातील रसानिक पदार्थ तुमच्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतात. आजकाल अनेक गृहिणी घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवतात. अशा अनेक टोमॅटो सॉस बनवण्याच्या सोप्या रेसीपी आहेत. चला तर जाणून घेऊया टोमॅटो सॉस बनवण्याची योग्य पद्धत. टोमॅटो सॉसची ही रेसीपी केल्यामुळे तुमच्या घरातील सदस्य आणि लहानमुलं प्रचंड खुश होतील. मग वाट कसली बघताय चला जाणून घेऊया सोप्या पद्धतीनं टोमॅटो सॉस कसा बनवायचा.

साहित्य : १ किलो पिकलेले टोमॅटो १ बारीक चिरलेला मोठा कांदा २-३ पाकळ्या लसूण १ इंच आले २-३ हिरव्या मिरच्या १ टीस्पून जिरे १/२ टीस्पून धने पावडर १/४ टीस्पून हळद पावडर १/२ टीस्पून लाल मिरची पावडर १/२ टीस्पून गरम मसाला 1 टीस्पून मीठ १/४ कप साखर (चवीनुसार) १ टीस्पून तेल १/२ कप पाणी ताजी कोथिंबीर

टोमॅटो सॉस बनवण्याची कृती

सर्वप्रथम मॅटो स्वच्छ धुवा आणि त्यांचे चार तुकडे करा. त्यानंतर कांदा, लसूण, आले आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. एका कढईमध्ये तेल गगरम करून त्यामध्ये जिरे घाला. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता त्यानंतर त्यात लसूण, आले आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परतून घ्या. परतलेल्या मिश्रणात धने पावडर, हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा. पॅनमध्ये चिरलेला टोमॅटो घाला आणि मिक्स करा. झाकण ठेवून 10-15 मिनिटे मध्यम आचेवर किंवा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्या. शिजवलेले मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घाये. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे पाणीही घालू शकता. तयार पेस्ट परत पॅनमध्ये घाला. त्यामध्ये चविनुसार साखर घालून मिक्स करा. सॉस घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. तयार सॉस एका वाडग्यात हलवा आणि ताज्या कोथिंबीरने सजवा. गरमागरम सर्व्ह करा.

या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा: तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉसमध्ये मसाल्यांचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. जर तुम्हाला गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण जास्त ठेवू शकता. जर सॉस खूप पातळ असेल तर आणखी थोडा वेळ शिजवा. सॉस जास्त दिवस टिकवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.