पणजीपासून फक्त 60 किमी अंतरावर ‘हा’ धबधबा, कसे पोहोचावे? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला फिरण्याचं एक खास ठिकाण सांगणार आहोत. निसर्गानं नटलेलं हे ठिकाण जाणून तुम्ही देखील लगेच प्लॅन कराल. हिवाळ्यात आरामशीर आणि साहसी सहलीचा बेत आखत असाल तर यावेळी गोव्याची राजधानी पणजीपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेल्या या सुंदर धबधब्याची सहल प्लॅन करा. या धबधब्याचे सुंदर दृश्य पाहून तुमचा सर्व थकवा दूर होईल.
फिरण्याचा प्लॅन आखत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही एका खास ठिकाणाविषयी माहिती देणार आहोत. त्या ठिकाणचा धबधबा पाहूण तुम्ही देखील लगेच तिथे जाण्याचा प्लॅन आखाल. हा धबधबा पणजीपासून फक्त 60 किलोमीटरवर आहे. जाणून घेऊया.
हिवाळ्यात ऑफबीट स्पॉट शोधण्याची मजा वेगळीच असते. तुम्हालाही या हिवाळ्यात ऑफबीट ठिकाणी जायचे असेल तर गोव्याचा प्लॅन करा. एक धबधबा आहे जो देशातील सर्वात लांब धबधब्यामध्ये गणला जातो. सुमारे 310 मीटर लांबीचा हा देशातील पाचवा सर्वात उंच धबधबा आहे. विशेष म्हणजे या धबधब्यासाठी गोव्याची राजधानी पणजीपासून अवघ्या 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या आत असलेल्या या धबधब्याला दुधसागर असे नाव देण्यात आले आहे. पावसाळ्यात त्याचे दृश्य पाहण्यासारखे असते. खऱ्या अर्थाने दुधाचा सागर मानला जात असल्याने त्याला दूधसागर असे नाव पडले. खरे तर त्याचे नाव त्याच्या दुधाळ पांढऱ्या रंगामुळे पडले आहे. मात्र, पावसाळ्यामुळे दूधसागर धबधबा जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बंद असतो.
दूधसागर धबधब्यावर कसे पोहोचावे?
दूधसागर धबधबा पणजीपासून काही अंतरावर आहे. तुम्ही गोव्याला जात असाल तर इथली राजधानी पणजी येथून रोड ट्रिप प्लॅन करू शकता. दूधसागर धबधब्यावर जात असाल तर दुचाकी भाड्याने घेऊ शकता आणि मार्गाचा ऑफलाईन नकाशा डाऊनलोड करून गोवा आणि पश्चिम घाट एक्सप्लोर करू शकता. धबधब्यावर जाण्यासाठी दोन किलोमीटरचा पायपीट करावा लागेल. दूधसागर धबधबा सुंदर
दूधसागर धबधबा हे गोव्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, जे दूरदूरवरून पर्यटकांना आकर्षित करते. इथली दृश्यं मंत्रमुग्ध करणारी आहेत. साहसासह काही निवांत क्षण घालवायचे असतील तर हे ठिकाण गोव्यातील सर्वोत्तम आहे. येथील निसर्गसौंदर्य पाहून पर्यटक धबधब्यात डुबकी मारण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. ट्रेकिंग करायचं असेल तर एकदा दूधसागर धबधब्याला नक्की या.
दूधसागर धबधब्याजवळची ‘ही’ ठिकाणे शोधा
दूधसागर धबधब्याजवळ काही खास आकर्षक ठिकाणे आहेत, जी आपण एक्सप्लोर करू शकता.
तांबडी सुर्ला मंदिर
दूधसागर धबधब्यापासून 25 किमी अंतरावर असलेले 12 व्या शतकातील भगवान शंकराला समर्पित असलेले हे प्राचीन मंदिर आपल्या कोरीव कामासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
डेव्हिल्स कॅन्यन
साहसी पर्यटकांसाठी डेव्हिल्स कॅन्यन हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला खरोखरच साहसाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर दूधसागर धबधब्यावर जाताना हे ठिकाण एक्सप्लोर करायला विसरू नका.
महावीर वन्यजीव अभयारण्य
दूधसागर धबधब्यापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आहे, जिथे आपल्याला बिबट्या, हरीण, हत्ती आणि अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतील.