Migraine: ‘ या ‘ घरगुती उपायांनी मायग्रेनच्या वेदना होतील दूर !

जर तुम्ही मायग्रेनच्या वेदनांमुळे त्रस्त असाल तर पेन किलर खाण्याऐवजी काही गरगुती उपाय करून पाहा. त्यामुळे तुमच्या वेदना कमी होऊ शकतील.

Migraine: ' या ' घरगुती उपायांनी मायग्रेनच्या वेदना होतील दूर !
Migraine
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 4:00 PM

मायग्रेन (Migraine)ही अशी डोकेदुखी आहे, ज्यामध्ये साधरणत: डोक्याच्या एकाज बाजूला वेदना (Headache) जाणवतात. मायग्रेनच्या वेदना काही तासांपासून ते संपूर्ण दिवस होऊ शकतात व तु्म्हाला त्याच्या त्रास सहन करावा लागू शकतो. मायग्रेनचा त्रास अतिशय वेदनादायक आणि असह्य असतो. मायग्रेनचा ॲटॅक (Migraine attack) आल्यानंतर काही लोकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांना प्रखर सूर्यप्रकाशामुळे मायग्रेनची समस्या वाढते.

मायग्रेनच्या वेदना कमी करण्याठी किंवा त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुग्ण बऱ्याच वेळेस पेन किलर घेतात. मात्र त्यामुळे तात्पुरते बरे वाटते. हा त्रास दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही सहज व सोपे उपाय सांगितले आहेत. ते केल्याने ही समस्या दूर होऊ शकते.

मायग्रेनच्या वेदना कमी करण्याचे घरगुती उपाय

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मायग्रेनच्या वेदना कमी करणे खूप सोपे आहे. आपल्या स्वयंपाकघरात काही असे पदार्थ आहेत, ज्यांचे सेवन केल्याने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

1) भिजवलेल्या मनुका – (Soaked Raisins)

मायग्रेनचा त्रास होत असेल तर भिजवलेल्या मनुका खाल्यामुळे हा त्रास कमी होऊन आराम मिळतो. सकाळी उठल्यानंतर पाण्यात भिजवलेल्या 10 ते 15 मनुका खाव्यात. त्यासाठी आदल्या रात्री एका वाटीत किंवा बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 10-15 मनुका भिजवून ठेवाव्यात. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम भिजवलेल्या मनुका नीट चावून खाव्यात. सलग 12 आठवडे सकाळी भिजवलेल्या मनुका खाव्यात. यामुळे जसजसा वेळ जाईल, तसे शरीरात जमा झालेले अतिरिक्त पित्त कमी होते आणि ॲसिडिटी, मळमळ, उलटी, जळजळ, डोकेदुखी अशी मायग्रेनशी संबंधित लक्षणे कमी होऊन हा त्रास दूर होतो.

2) वेलची आणि जिऱ्याचा चहा – (Cumin-Cardamom Tea)

सर्वांच्या स्वयंपाकघरात जिऱ्याचा वापर होतोच. तसेच घरात वेलचीही असतेच. जेव्हा मायग्रेनची लक्षणे तीव्र आणि गंभीर असतात, तेव्हा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने जीरे-वेलची घातलेल्या चहाचे सेवन करावे. हा चहा बनवण्यासाठी सर्वपर्थम अर्धा ग्लाल पाण्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि एक वेलची घालून ते पाणी 3 मिनिटे उकळावे. नंतर गॅस बंद करून हे पाणी नीट गाळून घ्यावे व या चहाचा आस्वाद घ्यावा. त्यामुळे मायग्रेनच्या वेदना कमी होतील.

3) गाईचे तूप – (Cow Ghee)

शरीर व मस्तकातील अतिरिक्त पित्त संतुलित करण्यासाठी गाईचे तूप उत्तम उपाय मानला जातो. या तुपाचा वापर तुम्ही जेवणात करू शकता. पोळीवर किंवा भातावर तूप घेऊन तुम्ही त्याचे सेवन करू शकता. तसेच रात्री झोपताना दुधामध्ये हे तूप घालून ते पिऊ शकता. नस्यद्वारे (अनुनासिक छिद्रांमध्ये तुपाचे २-२ थेंब टाकून) देशी तुपाचा वापरही करता येतो. हे मायग्रेनपासून मुक्ती मिळवण्यास मदत करते.

मायग्रेनच्या लक्षणांवर गोळ्या घेणं बंद करा आणि तुमच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या आयुर्वेदिक उपाय अवलंबवा. योग्य आहार व श्वसनाचे व्यायाम करून मायग्रेनची लक्षणे टाळून मायग्रेन मुळापासून दूर करता येते, असे डॉक्टरांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.