चेहरा, केस आणि नखांमधून रंग काढण्याची घरगुती सोपी पद्धत तुम्हाला माहित आहे का ?
होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, परंतु चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असे काही मार्ग सांगत आहोत, त्याचा अवलंब करून तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.
मुंबई – सगळीकडे यंदाच्या होळीची (holi 2022) तयारी सुध्दा झाली असेल. काही तासांवरती आलेली होळीची लहानमुलांपासून थोरापर्यंत उत्सुकता असते. भारतात होळी (indian holi) मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. होळीच्या दिवशी पाण्यातून अनेक रंग (water colour) शरिरावरती लावले जातात. पण त्या रंगात आता अधिक केमिकल असल्याचं अनेकदा आढळून आलंय. होळीच्या उत्सवादरम्यान शरिराला लागलेला रंग काढण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. काहीवेळेला लोकांच्या चेहऱ्यावरील रंग काढणं सोप्प असतं. पण काही लोकांच्या चेहऱ्यांवरील रंग अनेक दिवस तसाच पाहायला मिळतो. रंग काढण्यासाठी अनेकजण केमिकल (chemical) शाम्पूचा वापर करीत असतात. त्यामुळे चेहऱ्याचं आणि केसाचं मोठं नुकसान होतं. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल. होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, परंतु चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असे काही मार्ग सांगत आहोत, त्याचा अवलंब करून तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.
शरिरावरचा रंग कसा काढणार ?
होळीचा रंग शरीरावरून काढण्यासाठी लोक त्वचेला स्क्रब करायला लागतात, पण असे चुकूनही करू नये. असे केल्याने त्वचेचा रंग तर जातोच, पण त्यामुळे त्वचेला खूप नुकसान होते. चेहऱ्याचा आणि त्वचेचा रंग काढण्यासाठी बॉडीवॉश किंवा साबणाने आंघोळ केली तर अंगावर थोडेसे तेल चोळा. हे केवळ रंग निखळण्यास मदत करेल असे नाही तर तुमच्या कोरड्या त्वचेचे पोषण देखील करेल. जर तुम्हाला तेल वापरायचे नसेल तर तुम्ही घट्ट होणारी क्रीम किंवा लोशन देखील वापरू शकता. यानंतर जेव्हा तुम्ही टॉवेलने शरीर पुसता तेव्हा तुम्हाला दिसेल की टॉवेलमध्ये रंग आला आहे.
चेहऱ्यावरील होळीचा रंग कसा काढायचा
चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी डीप क्लींजिंग फेस वॉश वापरा आणि नंतर मॉइश्चरायझर वापरा. आवश्यक वाटल्यास, आपण दुसर्या दिवशी फेस मास्क वापरू शकता. जर तुम्ही होळी खेळण्याआधी तुमच्या शरीरावर तेल वापरत असाल, तर डीप टॅनिंग टाळण्यासाठी तुम्ही तेलावर सनस्क्रीन लावू शकता. रंग काढून टाकण्यासाठी बेसन, दही आणि लिंबाच्या मिश्रणासारखे घरगुती उपाय तुम्ही अवलंबत असाल, तर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी त्या मिश्रणात व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल घाला.
केसांमधून होळीचा रंग कसा काढायचा
होळी खेळून झाल्यानंतर तात्काळ केस धुवून काढा. रंग काढण्यासाठी दोन वेळा शॅम्पूची आवश्यकता असू शकते. तुम्हाला थकवा जाणवत असला तरीही, आळशीपणामुळे कंडिशनर लावणे टाळू नका, कारण होळीच्या रंगानंतर तुमच्या केसांना अतिरिक्त हायड्रेशन आवश्यक असतं. कंडिशनर नंतर हेअर सीरम लावा. हे केसांना सूर्यप्रकाशाच्या प्रभावापासून आणि रंगांमुळे होणारे कोरडेपणापासून दुरुस्त करेल. केस गळणे कमी करण्यासाठी हेअर स्पा करा किंवा घरच्या घरी डीप कंडिशनिंग मास्क वापरा.
नखांवरून होळीचा रंग कसा काढायचा
होळीच्या रंगापासून नखांचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही पारदर्शक नेलपॉलिश लावा, जी होळी खेळल्यानंतर नेलपॉलिश रिमूव्हरने सहज काढता येते. त्यानंतरही नखांमधून रंग जात नसेल, तर नखे कोमट पाण्याच्या टबमध्ये बदाम तेल किंवा व्हिनेगर घालून भिजवा. यामुळे नखांचा रंग निघून जाईल.