मनातून घाणेरडे विचार कसे काढायचे?; एक ट्रिक्स अन्…

लेखात नकारात्मक आणि घाणेरडे विचारांपासून मुक्त होण्याच्या प्रभावी मार्गांची चर्चा आहे. यामुळे तुमच्या मनाला शांत करण्यास आणि सकारात्मकतेला आवाहन करण्यास मदत करतील. नकारात्मक विचारांमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत होईल

मनातून घाणेरडे विचार कसे काढायचे?; एक ट्रिक्स अन्...
नकारात्मक विचार कसे काढाल?
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 2:36 PM

आपल्या मनातून नकारात्मक विचार पटकन बाहेर काढले पाहिजे. नकारात्मक विचार अधिक काळ मनात राहिले तर आपण निगेटिव्ह होतो. त्यातून चिडचिड होते आणि संपूर्ण दिवस खराब होतो. तसेच हा विचार अधिक काळ राहिला तर आपला स्वभावच निगेटिव्ह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच, पण आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे नकारात्मक विचार शक्य तितक्या लवकर मनातून काढले पाहिजे. जे जे काही घाणेरडे, विकृत आणि नैराश्य आणणारे विचार आहेत, ते तात्काळ दूर केले पाहिजे.

नकारात्मक आणि घाणेरड्या विचाराने निराशावादी विचार आणि विकृतीचा जन्म होतो. याच विचारांच्या प्रभावातून घेतलेले निर्णय सुद्धा नकारात्मक असू शकतात. त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. सततच्या नकारात्मक विचारामुळे आपलं मन त्याच दिशेने धावू लागतं आणि आपल्या मनातून सकारात्मक विचाराच निर्माण होत नाही.

ब्रेक घेऊन चिंतन करा

कामात मन न लागणे आणि घरात काही अडचणी असतील तर त्यामुळे नकारात्मक विचार निर्माण होतात. सकारात्मक विचारांच्या तुलनेत नकारात्मक विचार वेगाने व्यक्तीच्या दिमाग आणि मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं. त्यामुळे नकारात्मक विचारातून बाहेर पडायचं असेल तर कमीत कमी थोडा ब्रेक घ्या. चिंतन करा. त्यामुळे अशा विचारांना लगाम लागेल.

सकारात्मक विचारांचा अभ्यास

नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचारांचा अभ्यास करा. तसेच कोणतीही समस्या संतुलित पद्धतीने हाताळा. एखादा व्यक्ती जर फोनवरून उत्तर देत नसेल तर त्याच्याबाबत चुकीच्या नियतीने विचार करू नका. कदाचित ती व्यक्ती एखाद्या कामात व्यस्तही असू शकते.

प्राणायाम, ध्यान करा

ज्याच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात त्या व्यक्तीने रोज सकाळी उठून प्राणायाम आणि ध्यान केलं पाहिजे. सूर्य प्रकाशात गवतावर बसून प्राणायाम केल्यास मन प्रसन्न राहतं आणि सकारात्मक विचारांचा वास सुरू होतो.

विचार लिहून काढा

मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर विचार करू नका. ते विचार लिहून काढा. त्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

कामात व्यस्त राहा

मानसिक आजारांवरचा एकमेव उपाय म्हणजे कामात व्यस्त राहा. स्वत:ला कामात गुंतवून ठेवा. दिवसभर काम करण्याचा प्रण करा. त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाही. तसे विचार करण्याची सवडच मिळणार नाही. उलट तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.