तुमची त्वचा तेलकट आहे तर उन्हाळ्यात निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्या, अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढू लागतात. विशेषतः ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट असते, त्यांच्या त्वचेवर जास्त तेल येऊ लागते. ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी, चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.

उन्हाळा सुरू होताच आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यास सुरूवात करतोच. कारण या हंगामात विशेषतः त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वातावरणातील आर्द्रता आणि घामामुळे त्वचा चिकट दिसू लागते. विशेषतः ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट असते, त्यांच्या चेहऱ्यावर जास्त तेल जमा होऊ लागते. ज्यामुळे त्वचेवर मुरूम येणे, पुरळ येणे या व्यतिरिक्त तेलकट त्वचा असलेल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
उन्हाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेचीही योग्य काळजी घेतली पाहिजे. विशेषतः जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करावे? पण बऱ्याच लोकांना त्यांच्या त्वचेचा प्रकार माहित नसतो, म्हणून तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घेण्याचा आणि उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे ते आपण आजच्या या लेखातुन जाणून घेणार आहोत.
त्वचेचा प्रकार कसा ओळखायचा?
बऱ्याच लोकांना त्यांच्या त्वचेचा प्रकार माहित नसतो. ते ओळखण्यासाठी, तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर थोडी क्रीम लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. जर त्वचेने क्रीम पूर्णपणे शोषून घेतली तर तुमची त्वचा कोरडी आहे आणि जर क्रीम जास्त काळ त्वचेवर राहिली आणि हलका घाम आला तर समजा तुमची त्वचा तेलकट आहे. याशिवाय, चेहरा चिकट वाटेल आणि टी-झोन आणि हनुवटी तेलकट राहतील.
तज्ञ काय म्हणतात?
दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. संदीप अरोरा सांगतात की, तेलकट त्वचा असलेल्या लोकांना उन्हाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, जसे की वारंवार घाम येणे, चेहऱ्यावर चिकटपणा येणे, जास्त तेल उत्पादनामुळे छिद्रे बंद होणे आणि मुरुमे वाढणे. तसेच धूळ आणि घामामुळे त्वचेवर घाण साचत राहणे, ज्यामुळे त्वचेवर संसर्ग आणि ब्रेकआउटचा धोका जास्त निर्माण होतो.
अशी काळजी घ्या
डॉक्टर सांगतात की त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल, पण यामुळे त्वचा कोरडी होणार नाही. तसेच तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी टोनर वापरणे गरजेचे आहेत ज्यांने तुमच्या त्वचेवरील छिद्रे घट्ट होतील आणि त्वचा फ्रेश दिसेल. हलके आणि तेलमुक्त मॉइश्चरायझर वापरणे देखील महत्त्वाचे आहे. बाहेर जाण्यापूर्वी, वॉटर बेस्ड सनस्क्रीन लावा कारण तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने टॅनिंग आणि निस्तेजपणा येऊ शकतो. दिवसभर भरपूर पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि तुमची त्वचा चमकदार होईल. यानंतरही जर त्वचेशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
सौम्य फेस वॉश वापरा
उन्हाळ्याच्या या हंगामात दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. जे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. तसेच जास्त जोरात स्क्रबिंग करणे टाळा कारण यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते.
मॉइश्चरायझर वापरा
तुमची त्वचा तेलकट असली तरीही, तुमच्यासाठी मॉइश्चरायझर वापरणे महत्वाचे आहे. जेणेकरून संतुलन राखले जाईल. लाईट जेल किंवा वॉटर-बेस्ड ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरा जे तुमची त्वचा हायड्रेट ठेवेल आणि तुमचा चेहरा चिकट वाटणार नाही.
सनस्क्रीन वापरा
उन्हाळ्यात सूर्य खूप तीव्र असतो, म्हणून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी या काळात सनस्क्रीन लावा. तुम्ही तेलमुक्त आणि हलके सनस्क्रीन निवडावे. हे तुमच्या त्वचेला उन्हापासून वाचवण्यास मदत करेल.
टोनरचा वापर
टोनर वापरल्याने छिद्रे घट्ट होतात, तसेच पीएच पातळी संतुलित करण्यास मदत होते. म्हणून तुम्ही टोनर देखील वापरू शकता. हे लावल्याने तुमची त्वचा ताजी वाटेल. पण तुमच्या तेलकट त्वचेनुसार टोनर निवडा.
हायड्रेटेड रहा
उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेवरील चमक टिकून राहण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)