दूर आहात म्हणून काय झालं, जोडीदारासोबत असा साजरा करा ‘हग डे’

‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसा तरुणाईमध्ये उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहे. शनिवारी सर्वत्र ‘हग डे’ साजरा होत असला तरी काही कारणास्तव दूर असलेल्या ‘कपल्स्‌ना’हा दिवस कसा साजरा करावा? असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे.

दूर आहात म्हणून काय झालं, जोडीदारासोबत असा साजरा करा ‘हग डे’
प्रेमिकांंचा आज 'हग डे'.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 2:29 PM

काहीही अडचण, संकट किंवा आनंदाचा क्षण आला की आपले डोके जोडीदाराच्या खांद्यावर ठेवून सुटकेचा निश्‍वास सोडावा, सहवेदना आपल्या जोडीदाराला सांगून मन हलके करावे, जोडीदारांच्या उबदार मिठीत जाउन त्याच्या सहवासात काही काळ घालवावा, तो नेहमी आपल्या सोबत असल्याचा अनुभव घ्यावा, असे कधी ना कधी प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s day) आठवड्याभराच्या दिवसांमध्ये एक दिवस म्हणजे ‘हग डे’(Hug Day) असतो. या दिवशी जोडीदार एकमेकांना मिठी मारत सहवास (Cohabitation) अनुभवत असतात. जेव्हा जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःख होते तेव्हा आपण त्याला मिठी मारून आपण सोबत असण्याची भावना देत असतो. परंतु अनेक वेळा काही कारणास्तव आपल्याला जोडीदारासोबत राहता येत नाही, दुरावा सहन करावा लागत असतो. अशा वेळी या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दूर राहूनदेखील हा दिवस ‘खास’ साजरा करु शकतात.

जवळ असल्याची भावना

तुम्ही काही कारणांमुळे आपल्या जोडीदारापासून लांब असाल तरीही त्याच्याशी सतत कुठल्याही माध्यमातून संवाद साधत रहा, या दिवसांमध्ये त्याला तुम्ही सोबत असल्याचे सांगत रहा. संवादातूनही तुम्ही, जोडीदार आणि तुमच्यातील शारीरिक दुरावा कमी करू शकतात. आपल्या जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा करा, बोलण्यात नेहमी सकारात्मकता ठेवा, हे दूराव्याचे दिवस लवकरच निघून जातील व तुम्ही ऐकमेकांसोबत रहाल, ही भावना त्याच्या मनात निर्माण करावी.

1) तू दूर आहेस तरीही माझ्या मिठीत तू जवळ असल्याची अनुभूती मी घेत आहे. आपण एकमेकांना दुरू राहुनदेखील एकमेकांच्या खूप जवळ असल्याचा अनुभव घेत आहोत.

2) दूर असल्यावरही माझ्या प्रेमात किंचीतही दुरावा नाही, हीच तुझ्या प्रेमाची ताकद आहे, लांब असूनही तू माझ्या मिठीत आहेस.

3) मला तुझा हात सदैव हवा आहे, मला सदैव तुझ्या सोबत राहायचे आहे, रात्रंदिवस तुझ्या मिठीत राहायचे आहे, मला तुझ्याकडूनही हे वचन हवे आहे.

4) तुझ्या मिठीत येणं, जणू काही स्वर्ग मिळाल्या सारखं वाटतं, आता देवाला सांगायला हवं की तुझा स्वर्ग आता तुझ्याजवळच ठेव.

5) मनात फक्त तुझाच विचार असतो, दूर असूनही तु जवळ असल्यासारखे भासते, याला प्रेम नाही तर काय म्हणावे?

6) तुझ्या मिठीत मला राहू दे, तुझ्या श्वासात श्‍वास मिसळू दे… हृदय कधींपासून बेचैन आहे आज या प्रेमासाठी, तुझ्या हृदयात मला उतरू दे.

7) तुझ्या मिठीत असल्यावर जगातील सर्व सूखं मला कमी वाटतात, तु जवळ असल्यावर हे आकाशही मला ठेंगणे वाटते.

8) दुराव्याचे हे दिवस जातील लवकरच निघून, मग केवळ मी अन्‌ तु… तुझा सहवास दुरुनही माझ्याभोवती दरवळतो…

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.