‘प्रवासा’ दरम्यान उलटी किंवा मळमळ होत असल्यास वापरून पहा ‘या’ टीप्स!
प्रवासादरम्यान अनेकांना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. हे करून बघून तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.
प्रवासादरम्यान (during the journey), अनेकांना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत प्रवासाची सगळी मजाच खराब होऊन जाते. दुसरीकडे, जर तुम्ही सहलीला जात असाल आणि तुम्हाला अशी समस्या येत असेल तर संपूर्ण मूड खराब होतो. दुसरीकडे आपण जर, प्रवासात मसालेदार पदार्थ (Spicy food) खाल्ले तर त्रास आणखी वाढतो. प्रवासात मोशन सिकनेसचा त्रास होणारे बरेच लोक आहेत. हा काही गंभीर आजार नाही, परंतु ज्या व्यक्तीला ही समस्या आहे ती प्रवास करताना किंवा कोणत्याही प्रकारची हालचाल करताना चिंताग्रस्त, अस्वस्थ राहतो. मोशन सिकनेस फक्त कार, विमान, बस किंवा ट्रेनने प्रवास करताना होत नाही. टीव्ही पाहताना, जलद गतीने फिरणारी चित्रे पाहताना, डोलताना किंवा समुद्राच्या लाटा पाहतानाही ही समस्या उद्भवू शकते. पण ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची (Home Remedies) मदत घेऊ शकता. हे उपाय सोपे तसेच प्रभावी आहेत.
लिंबू
उलटी किंवा मळमळ होण्याच्या समस्येमध्ये लिंबू खूप फायदेशीर मानले जाते. प्रवासादरम्यान लिंबू आणि काळे मीठ सोबत ठेवा. लिंबू कापून आणि काळे मीठ टाकून त्याचा रस हळूहळू चोखा. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल.
आले
या प्रकरणातही आले खूप फायदेशीर मानले जाते. आल्याचा तुकडा लिंबू आणि काळे मीठ घालून तोंडात ठेवा आणि हळूहळू त्याचा रस घ्या. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. याशिवाय आल्याचे पाणी तयार करून प्रवासात पिऊ शकता.
बडीशेप
बडीशेप पचनाच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. बडीशेपचा थंड प्रभाव असतो, ती खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. तोंडाला चव चांगली येते आणि मळमळ होण्याची समस्या आटोक्यात येते. या प्रकरणात बडीशेप पाणी देखील उपयुक्त आहे.
हिरवी वेलची
प्रवासादरम्यान हिरवी वेलची नेहमी सोबत ठेवा. मळमळ झाल्यास हिरवी वेलची टॉफीप्रमाणे तोंडात टाकून त्याचा रस घ्या. यामुळे तुमच्या तोंडाची चव अधिक चांगली होईल.
एक्यूप्रेशर
उलटी आणि मळमळ या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक्यूप्रेशर देखील उपयुक्त ठरू शकते. तज्ज्ञांकडून अॅक्युप्रेशरच्या पॉइंट्सची माहिती घ्यावी आणि त्रास झाल्यास हे पॉइंट दाबावेत. याशिवाय दीर्घ श्वास घेणे देखील या समस्येत खूप उपयुक्त आहे.
साधे अन्न
ज्या लोकांना प्रवासात उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या आहे, त्यांनी प्रवासादरम्यान तिखट-मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय दुधापासून बनवलेल्या वस्तूही या दरम्यान खाऊ नयेत. साधे अन्न आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने आराम मिळतो.