पिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य उपचार

पिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेवर उपाय करणे फायद्याचे नाही तर त्वचेला आतूनही निरोगी करणे आवश्यक असते. यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. ही समस्या कशी टाळता येईल हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

पिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य उपचार
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 1:18 PM

बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण त्याचबरोबर असंतुलित आहार या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबर आपल्या त्वचेवर देखील होत असतो. यामुळे अनेकांना पिग्मेंटेशनचा त्रास हा तरुण वयात सुद्धा होत आहे. पिग्मेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिला या महागड्या क्रीम त्वचेवर लावतात. तर काहींना या क्रीम सूट होतात तर काहींना याचा आणखी जास्त त्रास होतो.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निरुपमा परवांडा यांच्या सांगण्यानुसार, पिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेवर उपचार करण्याऐवजी त्वचेला आतून पोषण मिळणे फार महत्वाचे आहे. तसेच जर एकदा पिग्मेंटेशन समस्या उद्भवली की त्यातून सुटका मिळवणं सोपं नसतं. त्वचेवरील काळ्या डागांचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

एक्सफोलिएशन पील

तज्ञांच्या मते, पिग्मेंटेशनचा प्रभाव कमी करण्यासाठी एक्सफोलिएशन पील्सचा वापर केला जाऊ शकतो. यात ग्लायकोलिक ॲसिड, यलो पील, ट्रायक्लोरो ॲसिटिक आणि कॉस्मेलन असते. जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.

डिपिग्मेंटिंग क्रीम

त्वचेतील पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या डिपिग्मेंटिंग क्रीमचा तुम्ही वापर करू शकता. यामध्ये असलेले कोजिक ॲसिड, अल्फा आर्ब्युटिन, ट्रॅनेक्सामिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी सारख्या डिपिग्मेंटिंग क्रीममुळे त्वचेतील पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. हे क्रीम मेलेनिनचे उत्पादन वाढण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे पिग्मेंटेशन कमी होते.

सनस्क्रीन लावा

त्वचातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कोणत्याही प्रकारचे पिग्मेंटेशन टाळण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करू शकता. कमीतकमी ३० एसपीएफ सह ब्रॉड-स्पेक्ट्रम असलेल्या सनस्क्रीन निवडा. तसेच तुम्ही दिवसातून दोनदा सनस्क्रीन लावा. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते.

लेसर एंड डिव्हाइस उपचार

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार तुम्ही लेसर एंड डिव्हाइस उपचाराने पिग्मेंटेशनची समस्या दूर करू शकता. यात क्यू-स्विच लेसर, फोटोफेशियल, मायक्रोलेन्स ॲरे, मायक्रोनेडलिंग आणि प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा यासारखे त्वचेचे उपचार पिग्मेंटेशनसाठी फायदेशीर ठरू शकतात.

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही योग्य आहाराचे पालन करणेही गरजेचे आहे. याशिवाय ज्या लोकांना या समस्या आहेत त्यांनी- दिवसातून किमान दोनदा गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे पिग्मेंटेशनही कमी होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.