चिकटपणामुळे उन्हाळ्यात केसांसाठी खोबरेल तेल वापरणे टाळता ? हे उपाय करून पहा, मिळतील मजबूत केस

उन्हाळ्यात केसांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत तुम्ही खोबरेल तेलाचाही अनेक प्रकारे वापर करू शकता. नारळ तेलाचा वापर कोणत्या प्रकारे करावा ते जाणून घेऊया.

चिकटपणामुळे उन्हाळ्यात केसांसाठी खोबरेल तेल वापरणे टाळता ? हे उपाय करून पहा, मिळतील मजबूत केस
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 5:10 PM

Coconut Oil : नारळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना (Coconut Oil) आपल्या निरोगी आणि मुलायम (strong hair) बनवण्यास मदत करते. दमट हवामानात केस कोरडे आणि निर्जीव (dry hair)होतात. खोबरेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. अनेकजण उन्हाळ्यात चिकटपणामुळे केसांसाठी तेल वापरणे टाळतात. पण केस निरोगी ठेवण्यासाठी तेलाचा वापर खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर इतरही अनेक प्रकारे करू शकता. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतात.

अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये मिसळून तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यामुळे उन्हाळ्यात केसांना अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात नारळाच्या तेलाचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते जाणून घेऊया.

खोबरेल तेल थोडे गरम करा. या तेलाने स्कॅल्पला 5 ते 6 मिनिटे मसाज करा. यानंतर थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी केस सौम्य शांपूने धुवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा खोबरेल तेल वापरू शकता.

नारळाचे तेल व कोरफड

केसांसाठी तुम्ही कोरफड आणि खोबरेल तेल देखील वापरू शकता. यासाठी 2 चमचे नारळाचे तेल आणि 2 चमचे कोरफडीचा रस हा एका बाऊलमध्ये घ्या व नीट एकत्र करा. आता हे मिश्रण लावून स्काल्पला थोडा वेळ मसाज करा. यानंतर कोरफड आणि खोबरेल तेलाचे मिश्रण काढून टाका. तुम्ही ते अर्ध्या तासासाठी टाळूवर ठेवू शकता. नंतर केस सौम्य शांपूने धुवा.

दही व नारळाचे तेल

तुम्ही दही आणि खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी एका भांड्यात 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात अर्धी वाटी दही घाला. या दोन्ही गोष्टी मिसळा आणि केस आणि टाळूला लावा. दही आणि खोबरेल तेलाचे मिश्रण टाळूवर तासभर राहू द्या. तुम्ही दही आणि खोबरेल तेलाचे मिश्रण आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

लिंबाचा रस व नारळाच्या तेलाचा वापर

एका भांड्यात 3 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. या दोन गोष्टी मिसळून टाळूला मसाज करा. आपण लिंबू आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण वापरू शकता. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हे मिश्रण आठवड्यातून 2 वेळा वापरले जाऊ शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.