नखांच्या वाढीसाठी हे तेल उपयुक्त, वापराच्या टिप्स जाणून घ्या

सुंदर, लांबसडक आणि मजबूत नखं असणं प्रत्येकाला आवडतं. मात्र त्यासाठी नखांची योग्य निगा राखणंही महत्वाचं ठरतं. त्यासाठी तुम्ही एका विशिष्ट तेलाचा वापर करू शकता.

नखांच्या वाढीसाठी हे तेल उपयुक्त, वापराच्या टिप्स जाणून घ्या
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 4:26 PM

नवी दिल्ली : लांबसडक, निमुळती पण स्ट्रॉंग नखं  (nails) असावीत, असे बहुतांश महिलांचे स्वप्न असते. पण बऱ्याच जणींची नख नीट वाढत नाहीत. ज्यांची नख लांब वाढतात, त्यांना ती पटकन तुटायची भीती असते. नखांचे सौंदर्य राखून तुम्ही तुमच्या सौंदर्यातही भर घालू शकता. नखांना योग्य पद्धतीने पॉलिश करून आकार दिल्यास, त्यांची नीट निगा राखल्यास त्यांचे सौंदर्य वाढू शकते.

बहुतांश महिला या त्यांच्या नखांकडे विशेष लक्ष देतात. पण, काही महिलांची नखे कमकुवत असतात. तसेच त्यांच्या नखांची वाढही मंद असते. पण, काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही नखांची वाढ सुधारू शकता. यासाठी तुम्ही जोजोबा ऑईल वापरू शकता. त्याचा वापर कसा करावा व त्याचे फायदे कोणते, हे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

नखांना मॉयश्चराइज करते व मजबूत बनवते

जोजोबा ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई, बी-कॉम्प्लेक्स आणि झिंक तसेच तांबे यासारखी मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. ती नखांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतात. हे तेल मॉयश्चरायझरचेही काम करते आणि नखांवरील कोरडा थर काढून टाकते. तुमच्या नखांना हायड्रेट करण्यासाठी तुम्ही जोजोबा तेल वापरू शकता. यामुळे नखे मजबूत होतात.

नखं कोरडी पडत नाहीत

कोरडी, खडबडीत क्युटिकल्समुळे नखांची वाढ रोखली जाऊ शकते आणि ते हॅंगनेलसाठी कारणीभूत ठरू शकते. जोजोबा ऑईलमधील महत्वपूर्ण गुणधर्मांमुळे नखांची क्यूटिकल मऊ करण्यासाठी आणि कंडिशन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. क्युटिकल्सना नियमितपणे जोजोबा ऑईलने मालिश केल्याने ते मॉयश्चराइझ राहतात व नखं कोरडी पडत नाहीत. तसेच तडाही जात नाही.

फंगल इन्फेक्शनपासून होतो बचाव

नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होणे, ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे नखांची वाढ कमी होऊ शकते. जोजोबा ऑईलमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे पंगल इन्फेक्शनशी लढा देण्यास मदत करतात. जोजोबा ऑईलचे काही थेंब नखांवर लावल्याने फंगसची वाढ कमी होते. मात्र गरज पडल्यास वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.

जोजोबा ऑईल कसे वापरावे ?

नखांच्या वाढीसाठी जोजोबा ऑईल वापरणे खूप सोपे आहे. आपल्या नेल केअर रूटीनमध्ये समाविष्ट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करू शकता –

– जोजोबा ऑईल लावण्यापूर्वी नखांवरील नेलपेंट काढून नखं स्वच्छ करून घ्यावीत.

– जोजबा ऑईल थोडं कोमट करून घ्यावे. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने शोषले जाईल.

– ड्रॉपर किंवा कापसाचा बोळा वापरून, जोजोबा ऑईलचे काही थेंब प्रत्येक नखावर लावा आणि हलक्या हाताने नखाना मसाज करा.

– त्यानंतर बोटांनी नखांना व आसपासच्या त्वचेला हळूवार मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच तेल चांगले शोषले जाते व नखांनाही आराम मिळतो.

– हे तेल रात्रभर नखांवर राहू द्यावे. सकाळी नखं स्वच्छ धुवावीत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.