Weight Loss : वजन घटवण्यासाठी गाळत असाल घाम, तर या ड्रायफ्रुट्सचीही होईल मदत…!

आजकाल बहुतांश लोक वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न करूनही फायदा मिळतोच असं नाही.

Weight Loss : वजन घटवण्यासाठी गाळत असाल घाम, तर या ड्रायफ्रुट्सचीही होईल मदत...!
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 5:10 PM

नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : बदलती जीवनशैली आणि बिघडलेल्या सवयी, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, वेळ न पाळणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक लोकं लठ्ठपणाची (overweight) शिकार होतात. जाडेपणा (obesity) हा शरीरासाठी घातक व जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे ठराविक वेळेतच वाढत्या वजनाला आळा घालणे उत्तम ठरते. तुम्हीही वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ड्रायफ्रुटसचे सेवन हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

ड्रायफ्रुटसमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे भूक कमी लागते व पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते. तसेच त्यामध्ये हेल्दी फॅट्स आणि इतर पोषक तत्वंही असतात, जी शरीरासाठी चांगली मानली जातात. वजन कमी करण्यासाठी कोणत्या ड्रायफ्रुटसचे सेवन फायदेशीर ठरू शकते, डाएटमध्ये समावेश करू शकतो ते जाणून घेऊया.

बदाम

बदाम हे प्रथिने आणि फायबरचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे पोट बराच काळ भरल्यासाराखे वाटण्यास मदत होते. तसेच बदाम हे मॅग्नेशियमचाही उत्तम स्रोत देखील आहे, जे तुमचे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते.

किशमिश

किशमिश हा फायबर व पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि आपला ओव्हर इटिंगपासून बचाव होतो. तसेच त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासही मदत होते. किशमिश मध्ये अँटीऑक्सीडेंट्सही मुबलक असतात, ज्यामुळे सेल्सचे नुकसान होण्यासपासून वाचतो.

खजूर

फायबर आणि पोटॅशिअमने युक्त असा खजूर खाल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं, जास्त भूक लागत नाही. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होते. त्यात लोहदेखील असतो, ज्यामुळे एनर्जी लेव्हल वाढते.

अक्रोड

अक्रोड हा प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत आहे, जे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे ओव्हर इटिंग होत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, तसचे जळजळही होत नाही. अक्रोडामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, तुमच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.