स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी या स्किन केअर टिप्स फॉलो करून पहा, मिळेल डागरहित त्वचा

How to Remove Stretch Marks: वजन वाढणे, कमी होणे, गरोदरपणा अशा अनेक कारणांमुळे काही व्यक्तींच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसतात. ते दूर करण्यासाठी काही स्किन केअर टिप्स फॉलो करणे फायदेशीर ठरेल.

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी या स्किन केअर टिप्स फॉलो करून पहा, मिळेल डागरहित त्वचा
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 12:48 PM

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेक लोकांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसतात. वजन वाढणे, कमी होणे, गरोदरपणा अशा अनेक कारणांमुळे स्ट्रेच मार्क्सची (Stretch marks) समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत काहीजण महागडी स्किन केअर प्रोडक्ट्स (expensive products) वापरूनही ते स्ट्रेच मार्क्स कमी करण्याचा प्रयत्नन करतात. पण काही लोकांना त्यात यश मिळत नाही. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल, स्ट्रेच मार्क्स सहजासहजी जात नसतील तर काही नैसर्गिक उपाय (natural remedies)करून तुम्ही त्यापासून लवकर सुटका मिळवू शकता. स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स जाणून घेऊया.

साखरेचा स्क्रब

त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी तुम्ही साखरेचा स्क्रब तयार करू शकता. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतात.

हळदीचा उपयोग करा

अँटी-ऑक्सिडंट तत्वांनी युक्त असलेली हळद स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी खोबरेल तेलात 1 चिमूट हळद टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे स्ट्रेच मार्क्स हळूहळू दूर होतील.

खोबरेल तेल लावावे

खोबरेल तेलाचा वापर स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी देखील उत्तम आहे. यासाठी खोबरेल तेलात कोरफडीचे जेल मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचे डागही कमी होऊ लागतील आणि तुमची त्वचा डागरहित दिसेल.

बदामाचे तेल ठरेल उपयुक्त

बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे देखील स्ट्रेच मार्क्स घालवण्यास अत्यंत प्रभावी आहे. यासाठी बदामाचे तेल स्ट्रेच मार्क्सची रोज लावून नियमित मसाज करा. यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतील आणि तुमची त्वचा चमकदार होईल.

बेकिंग सोडा वापरून पहा

तुमची स्किन स्ट्रेच मार्क्स फ्री करायची असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील. (

टी ट्री ऑईल वापरावे

टी ट्री ऑईलच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्सला कायमचे अलविदा म्हणू शकता. यासाठी टी ट्री ऑईलमध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून स्ट्रेच मार्क्सवर लावा. ही कृती नियमितपणे फॉलो केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागतील. (इमेज-कॅनव्हा)

कोरफडीचे जेल ठरेल सर्वात उपयुक्त

त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड जेलची मदत घेऊ शकता. यासाठी बदामाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात कोरफडीचे जेल मिसळा. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि मसाज करा. थोड्या वेळाने ती जागा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल.

बटाट्याचा रस

स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी बटाट्याचा रस लावणे हा देखील उत्तम पर्याय आहे. यासाठी बटाट्याच्या रसात हळद मिसळून ते मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा. यामुळे त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स काही दिवसातच निघून जातील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.