Monsoon Travel Tips : पावसाळी सहल एन्जॉय करायची असेल तर या टिप्स विसरू नका…

पावसाळ्यात प्रवास करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पावसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हिल स्टेशन किंवा इतर कोणत्याही डेस्टिनेशनला जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेऊन योजना आखा.

Monsoon Travel Tips : पावसाळी सहल एन्जॉय करायची असेल तर या टिप्स विसरू नका...
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 4:47 PM

Travelling Tips In Rainy Weather : जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल आणि तुम्हालाही पाऊस (monsoon) आवडत असेल तर निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटण्यासाठी पावसाळी सहल काढली पाहिजे. बहुतांश लोकांना थंडी किंवा उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात प्रवास करायला आवडतो. अशा ऋतूत ते जंगलात किंवा डोंगरांवर, हिल स्टेशनलाही फिरायला जातात

पण इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात प्रवासाची तयारी जरा वेगळ्या पद्धतीने करावी लागते. जर तुम्ही प्रवासाचे योग्य नियोजन केले तर तुम्हाला कोणताही त्रास न होता प्रवासाचा आनंद लुटता येईल. पावसाळ्यात सुरक्षित आणि आनंदाने प्रवास (monsoon travel tips) करण्यासाठी काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी.

या गोष्टी लक्षात ठेवा

  1. पावसाळ्याच्या दिवसात असे कपडे वापरा आणि बॅगेत ठेवा जे सहज वाळवता येतील. यासाठी हलके वजनाचे रेन जॅकेट, नायलॉन, पॉलिस्टर ड्रेस सोबत ठेवा. अशा गोष्टी असाव्यात ज्या हवेत सहज सुकतील. जीन्स इत्यादी जड कपडे वापरणे टाळावे.
  2. पावसात कापड किंवा चामड्याच्या शूजऐवजी वॉटरप्रूफ चपला वापराव्यात. तसेच ज्यांची पकड किंवा ग्रीप चांगली असेल, सहज घसरणार नाहीत, अशाच चपलांचा वापर करावा.
  3. कॅमेरा, बॅग आणि इतर इलेक्ट्रिक वस्तू झाकण्यासाठी, वॉटरप्रूफ कव्हर नक्की पॅक करा. एवढेच नाही तर तुम्ही तुमचा फोन, चार्जर इत्यादी गोष्टी अशा पाऊचमध्ये ठेवा, ज्यामध्ये पाणी जाऊ शकणार नाही.
  4. प्रवासादरम्यान तुम्ही कोणत्याही ढाब्यावर खात असाल तर प्यायला नेहमी घरातील पाणी सोबत ठेवा. या ऋतूकत बाहेरचे पाणी पिणे टाळावे, अन्यथा जुलाब होऊ शकतात.
  5. जर तुम्ही रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणार असाल तर आधीपासून बनवून ठेवलेले पदार्थ खाणे टाळा. गरमागरम पुरी-भाजी, असे पदार्थ खावेत. बाहेरचे पाणी असलेले किंवा थंड पदार्थ खाणे टाळा.
  6. तुमच्या बॅगमध्ये नेहमी छोटी छत्री ठेवा. ती तुम्हाला भिजण्यापासून वाचवू शकते. एवढेच नाही तर त्यामुळे तुम्ही पावसात कुठेही अडकून पडणार नाही.
  7. पावसात बाहेर प्रवास करताना हेअर ड्रायरचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. केस सुकवण्यासोबतच तुमचे कपडे, शूज किंवा इतर गोष्टी कोरड्या ठेवण्यासही त्याची मदत होईल.
  8. गरजेची औषधे नेहमी सोबत ठेवावीत. याशिवाय गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखी इत्यादींवर औषधेही कॅरी करावीत. या टिप्सचा वापर करून तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.