Immunity Booster Clove | चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘लवंगा’चे सेवन, होतील अनेक फायदे!

भारतीय स्वयंपाक घरात लवंगाचा मसाला म्हणून वापर केला जातो. यामुळे केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळतात. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे.

Immunity Booster Clove | चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘लवंगा’चे सेवन, होतील अनेक फायदे!
त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी वापरा लवंग फेस पॅक
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 12:02 PM

मुंबई : भारतीय स्वयंपाक घरात लवंगाचा मसाला म्हणून वापर केला जातो. यामुळे केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळतात. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. यातून बऱ्याच प्रकारची औषधे देखील तयार केली जातात. दररोज याचा उपयोग केल्यास दात, पोट, घसा इत्यादींची समस्या दूर होते. लवंगामध्ये युजेनॉल असते. यामुळे ताणतणाव आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो (Immunity Booster Clove eat before sleeping at night to get more health benefits).

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा छोटासा दिसणारा मसाल्याचा घटक पार्किन्सनसारख्या आजारासाठी देखील उपयुक्त आहे. या मसाल्यामध्ये व्हिटामिन ई, व्हिटामिन सी, फोलेट, रिबॉफ्लेविन, व्हिटामिन ए, थायमिन, व्हिटामिन डी, ओमेगा फॅटी आम्ल, आणि अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

अशा प्रकारे करा लवंगाचे सेवन

– रात्री झोपायच्या आधी दोन लवंगा खाऊन आणि एक ग्लास कोमट पाणी पिऊन आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

– रात्री लवंगाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. हे आपल्या पाचक प्रणालीसाठी देखील फायदेशीर आहे.

– लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यात सॅलिसिलेटचा एक प्रकार आहे, जो मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.

– कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. आपण हे दात खाली देखील दाबून धरू शकता. यामुळे वेदना देखील कमी होतील.

– हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 लवंगा घेऊ शकतात (Immunity Booster Clove eat before sleeping at night to get more health benefits).

– दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, जी कोरोना कालावधीमध्ये खूप महत्वाची आहे.

– लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

लवंगामध्ये कोणती पोषक तत्त्वे आहेत?

लवंगमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिज असतात. आहारात याच्या नियमित वापरामुळे शरीराला पुष्कळ पोषकद्रव्ये पुरवली जातात.

एक चमचा (2 ग्रॅम) लवंगामधील पौष्टिक घटक :

कॅलरी : 6

कार्ब : 1 ग्रॅम

फायबर : 1 ग्रॅम

मँगनीज : 55% – दैनिक मूल्य (डीव्ही)

व्हिटामिन के : 2% डीव्ही

मँगनीज एक महत्त्वपूर्ण खनिज आहे. यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुरळीत राहते. मजबूत हाडांसाठी देखील लवंगाचे सेवन आवश्यक आहे.

(Immunity Booster Clove eat before sleeping at night to get more health benefits)

हेही वाचा :

मेथीच्या दाण्यांचा फेसपॅक ट्राय करा आणि चेहऱ्यावरील मुरूमांना गुडबाय म्हणा!

आरोग्यासाठी लाभदायी ब्लू टी, जाणून घ्या फुलांपासून बनविलेल्या या अप्रतिम चहाबद्दल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.