Toxic Habits : ‘या’ सवयी वेळेवर सुधारा, नाहीतर लोकं म्हणतील टॉक्सिक..

Toxic Habits: तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसे पाहिली असतील ज्यांच्यापासून लोकांना दूर राहणे आवडते. हे लोक खूप नकारात्मक असतात. अशा लोकांपासून थोडं लांब राहणंच लोक पसंत करतात. कोणत्या सवयींमुळे स्वभाव टॉक्सिक होतो ते जाणून घेऊया.

Toxic Habits : 'या' सवयी वेळेवर सुधारा, नाहीतर लोकं म्हणतील टॉक्सिक..
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 11:19 AM

नवी दिल्ली : या जगात हरतऱ्हेची माणसं असतात, काही चांगली, साधी भोळी, तर काही वाईट, थोडी लबाडही. काही लोक असेही असतात, ज्यांना पाहून आपल्याला कळतं की हे अगदीच स्पष्ट किंवा फ्रँक (frank people) आहेत. त्यांच्या मनात एक, आणि बाहेर एक असं काही नसतं. छक्केपंज जमत नाहीत त्यांना. अशा लोकांचं इतरांशी पटकन जमतं, संवादही होतो. अशी लोक इतरांना खूप आवडतातही. तर दुसरीकडे काही व्यक्ती अशाही असतात, ज्यांच्यापासून दूर राहणे सर्वांनाच आवडते. खरंतर या लोकांचे शब्द किंवा विचार इतके नकारात्मक (negative thoughts) असतात की लोक त्यांच्यापासून दूर राहणे पसंत करतात. हे लोक प्रत्येक गोष्टीत काही ना काही खोट काढण्याचा, ती चुकीची सिद्ध (toxic habits) करण्याचा प्रयत्न करत असतात.

जर तुम्हाला असेही वाटत असेल की काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवतात, तर तुम्हाला तुमच्या सवयींमध्ये काही सकारात्मक बदल करावे लागतील. कोणत्या सवयींमुळे व्यक्तीचा स्वभाव टॉक्सिक होतो ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

1) तुमच्या आजूबाजूला तुम्हाला अशी काही माणसं दिसत असतील जी इतरांबद्दल केवळ वाईट विचार करतात. हे लोक इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत राहतात. अशा लोकांचे बोलणे काही काळ सहन करता येते. पण त्या लोकांसोबत जास्त काळ वेळ घालवणे अवघड असते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून इतर लोकं दूर राहणंच पसंत केले जाते.

2) तुम्हाला जगात काही असे लोकंही आढळतील जे इतर लोकांच्या सतत चुका शोधून त्यांचा सतत अपमान करत राहतात. त्यांना असं वाटतं की जगात फक्त तेच सर्वोत्तम, श्रेष्ठ आहेत. अशा लोकांना अहंकारी मानले जाते. मी-मी पणा करण्याची त्यांना फार हौस असते, त्यामुळे इतर लोक त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात.

3) कामाच्या ठिकाणी किंवा इतर अनेक ठिकाणी असे काही लोक असतात जे इतर लोकांना त्यांच म्हणणं मान्य करायलाच लावतात. मी सांगतो तेच कसं बरोबर, असा त्यांचा अविर्भाव असतो. आपलंच कसं योग्य, असं त्यांना वाटत असतं. अशा लोकांपासून इतर लोक खूप अंतर ठेवतात. हे लोक नेहमी समोरच्याला चुकीचे सिद्ध करण्यात व्यस्त असतात.

4) तर काही असेही लोक असतात, जे इतरांच ऐकून घेत नाही, फक्त स्वत:च तुणतुणं वाजवत असतात. मी सांगतो तेच बरोबर, असं सांगत समोरच्या व्यक्तीच्या मताला काही किंमतच देत नाहीत. आपण जे बोलतो, तेच योग्य, बाकीचे लोक चुकीचे आहेत, असा अहंकार त्यांना असतो. ते त्यांची चूक कधीच मान्य करत नाहीत. त्यांना वाटते की ते जे बोलत आहेत ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि बरोबरचं आहे. मात्र अशी लोकं इतरांना फारशी आवडतं नाही. आपल्यासोबतच इतरांचेही म्हणणे ऐकून घेणारे लोकं सर्वांना आवडतात, फक्त मी-मी पणा करणारे नव्हे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.