अशा पाच प्रसंगी आपला इगो टाळायला हवा, पाहा कोणते ते प्रसंग ?

जीवनात अनेकदा आपण आपल्या इगो किंवा अहंकारामुळे आपली जवळची नाती तोडत असतो. त्यामुळे इगो सांभाळताना आपण आपली नाती त्यापेक्षा मोठी आहेत. ती आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहेत हे विसरता कामा नये, त्यामुळे अशा पाच प्रसंगात आपण आपला इगो दूर ठेवावा..

अशा पाच प्रसंगी आपला इगो टाळायला हवा, पाहा कोणते ते प्रसंग ?
egoImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 6:36 PM

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : इगो वा अहंकार काही वेळेस माणसाला चांगला वाटत असला तरी अनेक वेळा तो समोरच्या दु:ख पोहचवू शकतो. मनुष्यप्राण्यातील अनेक भावनांमुळे जाणता अजाणता समोरच्या व्यक्तीला दु:ख पोहचू शकते. यापैकी भावना एक भावना म्हणजे इगो किंवा अहंकार ज्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. आपण आपल्या जीवनातील काही प्रसंगी आपल्यातील अहंकाराला गुंडाळून बाजूला ठेवले पाहीजे. तर या लेखात पाहूयात की कोणत्या अशा पाच सिच्युएशनमध्ये आपण आपल्यातील इगोला दूर ठेवले पाहीजेत…

कोणाकडून मदत किंवा सल्ला घेताना

जेव्हा आपल्याला इतरांकडून मदत किंवा सल्ला घ्यायचा आहे. तेव्हा नेहमी इगोला साईडला ठेवले पाहीजे. ज्यामुळे आपल्या एक चांगला सल्ला मिळू शकेल. आणि चुकनही आपण असे कोणतेही चुकीचं काम करायला नको ज्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकेल. त्यामुळे या सिच्युएशनला इगोला मध्ये आणायला नको. कारण अनेक वेळा निगेटिव्ह फिलींगमुळे आपण अनेक बाबींना नकळत बिघडवू शकतो.

आपल्या प्रेमळ व्यक्तीला माफ करताना

आपण आपल्या प्रेमळ जीवाभावाच्या लोकांबाबत कधी इगोला थारा द्यायला नको. कारण यामुळे आपले नाते खराब होऊ शकते. आणि समोरचा दुखावला जाऊ शकतो. कारण आपल्या प्रेमळ व्यक्ती कधीच हे सहन करणार नाहीत की आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार करतोय. असा प्रसंग अनेकदा येऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न कराल की आपल्या आणि प्रेमळ व्यक्ती दरम्यान कधीच इगो यायला नको

रिलेशनशिपमध्ये कंप्रोमाइज करताना

अनेकदा दोघांना एकत्र राहाताना कंप्रोमाईज करावे लागते. जर अशा वेळी आपण आपल्यातील इगोला समोर आणले तर नात्यातील गोडवा कायम राहाणार नाही. नेहमी एकाच बाजूने कंप्रोमाईज केल्याने अनेकदा नकारात्मकता वाढते. समोरच्या व्यक्तीला सिच्युएशन वाईट होऊ शकते.त्यामुळे तुम्ही नेहमी प्रयत्न करा की तुमच्या नात्यात दोघांनी समपातळीवर कंप्रोमाईज करायला हवे. कारण कंप्रोमाईज करणे काही वाईट गोष्ट नाही. तसेच प्रयत्न करा की अशा वेळी इगोला बाजूला ठेवायला हवे.

दुसऱ्याच्या अचिव्हमेंटला सपोर्ट करताना

अनेकदा एखाद्याच्या अचिव्हमेंट किंवा यशाने दुसऱ्याला इर्ष्या किंवा जळावू वृत्ती तयार होते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा इगो दुखावतो. आपण मनुष्य असल्याने आपण आपल्या सहकाऱ्यांच्या यशाचे अभिनंदन करायला हवे. आपल्या भविष्यात लागणाऱ्या मदतीसाठी तेच आपल्या सोबत असल्याने आपण त्यांची सुखात सुख मानले पाहीजे. त्यामुळे एकमेकांच्या यशाचे अभिनंदन केले पाहीजे.

आपल्या परिस्थितीला समजून घेणे

अनेकदा आपल्याला काही गोष्टीबाबत काही कल्पना नसते. परंतू तरीही आपण आपल्याला सर्वकाही ज्ञात असल्यासारखे व्यक्त होतो. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला त्याबाबत विचारतो तेव्हा आपल्याला इगो मध्ये येतो. जर आपले काही चुकत असेल किंवा आपल्यात काही चूक असेल तर आपण त्याची कबूली दिली पाहीजे. परिस्थिती समजून घेतली पाहीजे. आपल्या चूकीची कबूली आपले नाते वाचवू शकते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.