Immunity Booster Foods: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आजपासूनच आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश
रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीर संसर्गजन्य विषाणूंशी लढू शकते. मजबूत इम्युनिटीसाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमचे सर्दी-खोकला , ताप यापासून संरक्षण होईल.
नवी दिल्ली – थंडीच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारची इन्फेक्शन्स आणि आजार होऊ शकतात. सध्या चीनसह जगभरात कोरोनाचा (corona) कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. थंडीच्या दिवसांत (winter) सर्दी-खोकला, ताप येणे आणि अन्य आजारांचाही (diseases) धोका असतो. मात्र जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुमचा या आजारांपासून बचाव होऊ शकतो. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही इम्युनिटी वाढवू शकता. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
1) व्हिटॅमिन – सी युक्त पदार्थ
जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल, तर तुम्ही आहारात व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश करू शकता. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. मोसंबी, आवळा, लिंबू इत्यादी आंबट फळांचे तुम्ही सेवन करू शकता.
2) अँटी-ऑक्सीडेंट समृद्ध पदार्थ
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात कांदा, लसूण, आलं इत्यादींचा समावेश करू शकता. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतील, ज्यामुळे तुम्ही शरीरात होणारा संसर्ग टाळू शकता.
3) व्हिटॅमिन-ई समृध्द पदार्थ
ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही काजू, बदाम, अक्रोड इत्यादींचे सेवन करू शकता. ते व्हिटॅमिन-ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात.
4) लोह युक्त पदार्थ
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही रोज लोहयुक्त पदार्थ खाऊ शकता. यासाठी पालक, ब्रोकोली, संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करता येतो. अथवा स्वयंपाकासाठी लोखंडी भांड्यांचाही वापर करू शकता.
5) हळदीचे सेवन करा
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते. रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर होतोच, त्याशिवाय हळद घातलेले दूध अथवा हळदीचे पाणीही पिऊ शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)