मुंबई : सध्या उन्हाळा सुरु आहे. आपली पचनक्रिया ठिक ठेवण्यासाठी आपल्याला गरमीच्या दिवसात संतुलित आहार घ्यायला हवा. अधिक तिखट खाणे किंवा गरम पडणारा पदार्थ खाणे शरिराला त्रासदायी असते. गरमीमध्ये आपण अशाप्रकारचे फूड आणि ड्रिंक्स डायटमध्ये सामील करू शकता, जे आपल्या शरिराला थंडावा देऊ शकतील. उन्हाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा. तेलकट खाण्यामुळे तुमच्या शरिरात पचनक्रियेसंबंधी समस्या उद्भवू शकतात. (Include these healthy and light foods in your diet on hot days)
गरमीच्या दिवसांत लोक अधिक प्रमाणात दूधीचे सेवन करतात. यामध्ये पुरेशी पोषक तत्त्वे असतात. दूधीची भाजी, रायता, हलवा बनवून तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. याशिवाय तुम्हाला दूधी वडी सब्जी तयार करता येईल. दूधी आणि डाळची वडी, हिरवी मिरची, हिंग, टोमॅटो, आले, कांदा, लाल मिरची, हळद पावडर, मीठ आणि कोथिंबीर आदी मसाल्यांपासून दूधी वडी भाजी तयार केली जाते. तुम्ही भाकरीसोबतही भाजी खाऊ शकता. उत्तर भारतात ही डिश अत्यंत लोकप्रिय आहे. ही डिश खूप हलकी आणि आरोग्यदायी आहे.
गरमीच्या दिवसांत लोक आंबट खाण्यावर अधिक भर देतात. अशा लोकांसाठी इमली भाताची डिश सर्वोत्तम पर्याय आहे. चिंचेची ग्रेव्ही, उकडलेले तांदूळ, मूंगफळी, कडीपत्ता, चणाडाळ आदीपासून ही डिश तयार केली जाते. ही एक साऊथ इंडियन डिश आहे. दक्षिण भारतात या डिशला पुलिहोरा नावाने ओळखले जाते व तितक्याच अधिक प्रमाणावर दक्षिण भारतात या डिशला पसंती दिली जाते. पचनाच्या दृष्टीने ही अत्यंत हलकी डिश असून गरमीच्या दिवसांत या डिशचा अवश्य लाभ घ्या.
गरमीच्या दिवसांत आपण विविध प्रकारे आंब्याचा उपयोग केला जातो. आंब्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपिज बनतात. पश्चिम बंगालमध्ये डाळ आणि आंबा एकसाथ शिजायला ठेवले जातात. याला कच्चा आंब्याची डाळ म्हणतात. ही डिश मसूर डाळ, कच्चा आंबा, सरस, मीठ, मोहरी, साखर आणि लाल मिरचीपासून तयार केली जाते. स्टीम राईसबरोबर या डाळीचे सेवन केले जाते. या डाळीचा स्वाद आंबट-गोड अशा संमिश्र चवीचा असतो.
ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये सर्रास टोमॅटोचा सार बनवला जातो. टोमॅटो पुरी आणि मसाल्यांपासून ही डिश बनवली जाते. भातावर टोमॅटो सार खाल्ल्यास उन्हाळ्यात ते जेवण सहज पचते. अत्यंत हलके आणि चविष्ठ रेसिपी म्हणून टोमॅटो सारकडे पाहिले जाते. (Include these healthy and light foods in your diet on hot days)
एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री, Tata कडून ‘या’ कारच्या किंमतीत वाढ, ग्राहकांना झटका#PriceHike #Tata #TataMotors #CarsPriceHikehttps://t.co/faF6pJvdsI
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2021
इतर बातम्या
Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स
सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल