Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘या’ ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्याची एक वेगळीच मजा, जाणून घ्या

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वत्र देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शाळा असो, कॉलेज असो किंवा कोणतेही सरकारी कार्यालय असो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. भारतात केवळ दिल्लीच नाही तर इतर अनेक शहरांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

भारतातील 'या' ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्याची एक वेगळीच मजा, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 25, 2025 | 12:17 PM

प्रजासत्ताक दिन हा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. याच दिवशी भारतात संविधान लागू झाले होते आणि जगातली सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारूपाला आला. तसेच हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो. कारण हा दिवस आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या म्हणून हा दिवस बलिदानाची आठवण करून देणारा आहे. प्रजासत्ताक दिनी संपूर्ण देशभरात देशभक्तीचे वातावरण असते. दरम्यान यंदाचा प्रजासत्ताक दिन ७६ वा असल्याने सोहळा आणखीनच खास होणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी इमारतींवर तिरंगा झेंडा फडकवला जातो. तर भारतातील अशी काही शहरे आहेत जिथे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव विशेष आणि उल्लेखनीय आहे.

तुम्ही सुद्धा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी या शहरांना भेट दिल्याने हा दिवस आणि अनुभव तुमच्या कायम संस्मरणीय ठरेल. चला जाणून घेऊया भारतातील अशा निवडक ठिकाणांबद्दल जिथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहणे हा एक अनोखा आनंद साजरा करता येणार आहे.

1. कार्तव्य पथ, दिल्ली

दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा देशाची राजधानी दिल्लीत पार पडतो. कार्तव्य पथावर परेडचा कार्यक्रम आयोजित केला जातो, जिथे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे जवान आपले सामर्थ्य आणि शौर्य प्रदर्शित करतात. परेडमध्ये झांकी, लष्करी उपकरणांचे प्रदर्शन, ध्वजारोहण आणि हवाई दलाच्या विमानांचे हवाई डावपेच पाहण्यासारखे असतात. राष्ट्रपती तसेच प्रमुख पाहुणे तिरंगा फडकवतात आणि त्या ठिकाणी २१ तोफांची सलामी दिली जाते.

2. मरीन ड्राइव्ह, मुंबई

मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा खूप खास असतो. मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर तिरंगा घेऊन अनेक लोक देशभक्तीचा हा दिवस करतात. इथलं दृश्य पाहण्यासारखं असून देशभक्ती आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेलं असते. मरीन ड्राइव्हवर ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा ही आनंद घेता येईल.

3. वाघा बॉर्डर, पंजाब

वाघा बॉर्डरवर दररोज बीटिंग रिट्रीट सोहळा होतो, पण प्रजासत्ताक दिनी तो अधिकच खास ठरतो. भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांमधील हा सोहळा पाहण्याजोगा आहे. या खास इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हीही सकाळी लवकर वाघा बॉर्डरवर पोहोचू शकता. येथील देशभक्तीची तळमळ आणि उत्साह लक्षणीय आहे.

4. जयपूरचे राजवाडे आणि किल्ले

प्रजासत्ताक दिनी राजस्थानच्या जयपूरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील ऐतिहासिक किल्ले आणि राजवाडे तिरंगी दिव्यांनी सजवले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त अल्बर्ट हॉल आणि आमेर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. रेड रोड, कोलकाता

5. रेड रोड, कोलकाता

कोलकात्यात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा रेड रोडवर साजरा केला जातो. या परेडमध्ये पोलीस, लष्कर, एनसीसी कॅडेट आणि सरकारी विभागांचे फ्लोट्स असतात. परेडदरम्यान बंगालचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक प्रगतीचे ही दर्शन घडते. त्यादरम्यान हे क्षण आपल्या खूप स्मरणीय राहतात.

पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा.
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा.
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर.
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर.
वनविभागाचं खोक्याच्या घरावर बुलडोझर, दमानियांकडून खंत; '...चूक काय'
वनविभागाचं खोक्याच्या घरावर बुलडोझर, दमानियांकडून खंत; '...चूक काय'.
'आमच्याकडे या, आम्ही...', एकनाथ शिंदे अन् दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर
'आमच्याकडे या, आम्ही...', एकनाथ शिंदे अन् दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर.
अमोल मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? कोणी केली मागणी?
अमोल मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? कोणी केली मागणी?.
'खोक्या'च्या घरावर सरकारी बुल्डोझर, आता पुढचा हिशेब पोलीस कोठडीत होणार
'खोक्या'च्या घरावर सरकारी बुल्डोझर, आता पुढचा हिशेब पोलीस कोठडीत होणार.
जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत येणार? राज्यात राजकीय भूकंप होणार?
जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत येणार? राज्यात राजकीय भूकंप होणार?.
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.