Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांची ही आवडती रोटी बनली जगातील नंबर 1 ब्रेड, जाणून घ्या रेसीपी 

भारतात कोणतेही जेवण रोट्यांशिवाय पूर्ण होत नाही. मग ती घरी बनवलेली गव्हाची पोळी असो किंवा रेस्टॉरंटमधील नान असो. आता भारतातील एक रोटी जगातील नंबर वन ब्रेड बनली आहे.

भारतीयांची ही आवडती रोटी बनली जगातील नंबर 1 ब्रेड, जाणून घ्या रेसीपी 
Follow us
| Updated on: Mar 19, 2025 | 9:51 PM

आपल्या भारतीय जेवणाची खाासियत अशी आहे की येथील प्रत्येक पदार्थांमध्ये चव, प्रेम आणि सुगंध त्याचबरोबर पदार्थांचा टेक्सचर यांचे एक वेगळे मिश्रण असते. यामुळे प्रत्येक पदार्थ हा एकदम चवदार लागतो. भारतीय पाककृतीमध्ये रोटी आणि ब्रेडचे महत्त्व आहे. मग ती घरी साधी आपली गव्हाची पोळी असो किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारी तंदुरी रोटी आणि नान असो. जेवणाची प्रत्येक प्लेट पोळी आणि रोट्यांशिवाय अपूर्ण वाटते. आता भारतीय पाककृती प्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण आपल्या भारतातील अशीच एक रोटी आहे ज्याला उत्कृष्ट चव आणि लोकप्रियतुमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर वन ठरली आहे.

हो, अलिकडेच जागतिक अन्न मार्गदर्शक ‘टेस्ट अ‍ॅटलास’ने जगातील 50 सर्वोत्तम ब्रेडची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रेडपैकी एकाने बाजी मारली आहे. आज या लेखात आपण जाणून घेऊया, कोणती ब्रेड जगातील नंबर वन ब्रेड ठरली आहे, ती कशी बनवली जाते आणि त्याची खासियत काय आहे?

View this post on Instagram

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

टेस्ट अ‍ॅटलास रँकिंग म्हणजे काय?

टेस्ट अ‍ॅटलास (Taste Atlas) ही एक जागतिक अन्न मार्गदर्शक संस्था आहे जी जगभरातील खाद्यपदार्थ आणि पेयांची लोकप्रियता आणि चव यांच्या आधारे फूड क्रिटिक्सकडून रिव्ह्यू घेते. सोबतच रिसर्च पेपर्सच्या मदतीने पारंपारिक पद्धतीने बनलेल्या व्यंजनाच्या अस्ल रेसिपीसना रँकिंग देते. यावेळी टेस्ट अ‍ॅटलासने जगातील टॉप 50 ब्रेडची यादी जाहीर केली, ज्यामध्ये इंडियन बटर गार्लिक नानला सर्वोत्तम ब्रेड म्हणून नंबर वन घोषित केले आहे. ‘जगातील टॉप १०० ब्रेड’ च्या या यादीत इतर अनेक भारतीय ब्रेडचाही समावेश आहे.

बटर गार्लिक नान का खास आहे?

बटर गार्लिक नान त्याच्या मऊ आणि फ्लॅकी टेक्सचर, बटरचा क्रिमी थर आणि गार्लिकचा म्हणजेच लसणाच्या अद्भुत सुगंधासाठी ओळखला जातो. ही तंदूरवर भाजलेली ब्रेड सर्व प्रकारच्या ग्रेव्ही, बटर चिकन, दाल मखनी, मलाई कोफ्ता आणि शाही पनीर सारख्या विविध भारतीय पदार्थांसोबत खाल्ले जाते. नान हे जगभरातील खाद्यप्रेमींना आधीच आवडते, पण आता त्याला अधिकृतपणे जगातील सर्वोत्तम ब्रेडचा दर्जा मिळाला आहे.

बटर गार्लिक नान कसा बनवला जातो?

बटर गार्लिक नान बनवण्यासाठी मैदा, दही, दूध, मीठ, यीस्ट किंवा बेकिंग पावडर वापरतात, ज्यामुळे ते मऊ आणि किंचित फ्लॅकी होते. तसेच ही नान तंदूरवर भाजली जाते. गरम तंदूरमध्ये भाजल्यानंतर त्यावर लोणी किंवा तूप लावले जाते आणि त्यावर बारीक चिरलेला लसूण टाकला जातो. यामुळेच त्याला एक अद्भुत चव आणि सुगंध मिळतो. तुम्ही ते व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थांसोबतही खाऊ शकता. त्याची चव तुमच्या तोंडात कायम राहील.

'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा.
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?.
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल.
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?.
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.