तुम्हीही ट्रेनमधून चादर-टॉवेल घेता ? दंड तर होईलच पण जेलवारीही…

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल दिले जातात. प्रवासी या वस्तू वापरू शकतात. मात्र, काही लोक ते बॅगेत ठेवतात आणि प्रवास संपल्यानंतर घरी घेऊन जातात. थोडक्यात त्याची चोरी करतात. पण असं करणं त्यांना महागात पडू शकतं. खरंतर, आतापर्यंत 14 कोटी रुपयांचे टॉवेल आणि बेडशीट चोरीला गेले आहेत, ज्यासाठी तुरुंगापासून ते दंडापर्यंत शिक्षा आहे.

तुम्हीही ट्रेनमधून चादर-टॉवेल घेता ? दंड तर होईलच पण जेलवारीही...
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 2:57 PM

Railway journey : भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोकं प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विशेष काळजी घेते. प्रवासादरम्यान प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल दिले जातात. प्रवासी या वस्तू वापरू शकतात. मात्र, काही लोक ते बॅगेत ठेवतात आणि प्रवास संपल्यानंतर घरी घेऊन जातात. थोडक्यात त्याची चोरी करतातट्रेनमध्ये मिळणारे बेडशीट आणि टॉवेल तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता असा रेल्वेचा नियम नाही. म्हणजेच हे नियमबाह्य आहे. जर तुम्हालाही ट्रेनमध्ये मिळणाऱ्या वस्तू अशा घरी न्यायची सवय असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. आतापर्यंत 14 कोटी रुपयांचे टॉवेल आणि बेडशीट चोरीला गेले आहेत.

ट्रेनच्या बाहेर जर तुमच्याकडे बेडरोल किंवा त्याच्याशी संबंधित साहित्य आढळले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असे साहित्या चोरून घरी नेले तर त्या व्यक्तीवर काय कारवाई होऊ शकते, त्यासाठी काय शिक्षा आहे, ते जाणून घेऊया.

बेडरोल चोराल तर खबरदार..

प्रवासासाठी दिलेला बेडरोलही अनेकजण घरी घेऊन जातात. असे करताना कोणी पकडले तर त्या प्रवाशाविरुद्ध कारवाई होऊ शकते. वास्तविक, हे सर्व सामान ही रेल्वेची मालमत्ता मानली जाते.रेल्वे मालमत्ता कायदा 1966 अंतर्गत ट्रेनमधून माल चोरीच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा प्रकरणात कोणी चोरी करताना आढळलं तर या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि एक हजार रुपये दंडही होऊ शकतो. तुरुंगवासाची शिक्षा तर ती 5 वर्षांपर्यंत वाढू शकते.

बेडरोल मध्ये काय असतं ?

जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही एसी कोचमध्ये प्रवास करता तेव्हा रेल्वेच्या बेडरोलमध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशाचे कव्हर आणि एक टॉवेल समाविष्ट असतो. मात्र, आता रेल्वेकडून टॉवेल क्वचितच पुरविले जातात. तर, एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांनाच बेडरोल दिला जातो.

एका डेटानुसार, 2017-18 साली 1.95 लाख टॉवेल्स, 81,776 चादरी, 5,038 उशांची कव्हर्स आणि 7,043 ब्लँकेंट्स चोरीला गेले होते. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात बेडरोलच्या वस्तूंची चोरी होते. या वस्तूची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे समजते. अशा परिस्थितीत, लोकांनी हे सामान चोरी करू नये म्हणून रेल्वे अंटेंडंट्सना हे सर्व सामान प्रवास संपण्यापूर्वी अर्धा तास आधी गोळा करण्याचा सल्ला दिला जातो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.