रेल्वे तिकीटावर मिळतात बऱ्याच मोफत सुविधा; हे फायदे 99% लोकांना माहित नसतील

रेल्वे तिकीटाचा वापर फक्त आरमदायी सीट मिळवण्यासाठीच होतो असं नाही. तर, प्रवाशांना या तिकीटोसोबत अनेक सुविधा आणि अधिकारही मिळतात आणि तेही अगदी मोफत. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना याबद्दल माहित नाहीये. जाणून घेऊया नक्की त्या सुविधा कोणात्या आहेत ते.

रेल्वे तिकीटावर मिळतात बऱ्याच मोफत सुविधा; हे फायदे 99% लोकांना माहित नसतील
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 7:09 PM

कुठे लांबच्या प्रवासाला जाताना आपण शक्यतो रेल्वेचाच पर्याय निवडतो. आरामात प्रवास व्हावा यासाठी आपण अगदी महिनाभर वैगरे रेल्वेचं तिकीट काढून ठेवतो. पण रेल्वे तिकीटाचा वापर फक्त आरमदायी सीट मिळवण्यासाठीच होतो असं नाही. तर, प्रवाशांना या तिकीटोसोबत अनेक सुविधा मिळता, अनेक अधिकार असतात. पण शक्यतो आपल्यातल्या बऱ्याच जणांना हे माहितच नसेल. रेल्वे तिकीटावर आपण नेमक्या काय सुविधा मिळवू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात.

रेल्वेचे तिकीट खरेदी करून, प्रवाशाला अनेक अधिकार. सुविधा मिळतात, तेही अगदी मोफत. जसं की

रिफंडचा दावा करू शकता

भारतीय रेल्वे सर्व AC1, AC2, AC3 कोचमध्ये प्रवाशांना एक ब्लँकेट, एक उशी, दोन बेडशीट आणि एक हँड टॉवेल दिला जातो. मात्र, गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये यासाठी लोकांना 25 रुपये मोजावे लागतात. याशिवाय, काही गाड्यांमध्ये प्रवाशांना स्लीपर क्लासमध्येही बेडरोल मिळू शकतात. तुम्हाला जर ट्रेन प्रवासादरम्यान बेडरोल न मिळाले नाही तर तुम्ही याबाबत तक्रार करून रिफंडचा दावा करू शकता.

मोफत प्राथमिक उपचार

रेल्वेने प्रवास करताना अचानक तुमची तब्येत बिघडली, तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटलं तर तुम्हाला रेल्वेकडून मोफत प्राथमिक उपचाराची व्यवस्थाही केली जाते. आणि समजा काही कारणास्तव प्रकृती गंभीर असल्यास पुढील उपचाराचीही व्यवस्था केली जाते. यासाठी तुम्ही फ्रंट लाइन कर्मचारी, तिकीट कलेक्टर, ट्रेन अधीक्षक इत्यादींशी संपर्क साधू शकता.

गरज भासल्यास, भारतीय रेल्वे तुमच्यासाठी पुढील ट्रेनच्या थांब्यावर वाजवी शुल्कात वैद्यकीय उपचारांची व्यवस्था देखील करते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसली तरीही तुम्ही जर आजारी असाल तर प्रवास करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या.

मोफत जेवण

रेल्वेच्या तिकीटाचा पुढचा फायदा म्हणजे तुम्हाला मिळणारे फ्री फूड. जर तुम्ही राजधानी, दुरांतो आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन 2 तासांपेक्षा जास्त उशीर होत असेल, तर रेल्वे तुम्हाला मोफत जेवण देते.

याशिवाय, जर तुमची ट्रेन उशीर आली आणि तुम्हाला काहीतरी चांगले खायचे असेल तर तुम्ही आरई ई-कॅटरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकता.

स्टेशनवर 1 महिन्यापर्यंत सामान ठेवण्यासाठी लॉकर

दरम्यान तुम्हाला जर काही कारणास्तव तुमचं सामान प्रवासादरम्यान घेऊन जाणे शक्य नसेल तर त्याचीही व्यवस्था असते. देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर क्लोकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध असतात. हे बऱ्याच अंशी लोकांना माहिती नसतं. तुम्ही तुमचे सामान या लॉकर रूम आणि क्लोकरूममध्ये जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत ठेवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल.

वेटिंग हॉलची सुविधा

ट्रेन येण्यास अजून अवकाश असेल किंवा एखाद्या स्टेशनवर उतरल्यानंतर पुढची ट्रेन पकडण्यासाठी काही वेळ तुम्हाला स्टेशनवर थांबावं लागलं किंवा इतर काही कामासाठी स्टेशनवर थांबावं लागलं, तर तुम्ही एसी किंवा नॉन-एसी वेटिंग हॉलमध्ये आरामात थांबू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. तुम्हाला फक्त तुमचे ट्रेनचे तिकीट दाखवावं लागतं.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.