ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना मिळणार फ्री जेवण अन् चहा/कॉफी; पाहा कोणत्या ट्रेनचा समावेश

जर तुमच्या ट्रेनला विलंब झाला तर तुम्हाला मोफत जेवण आणि चहा/कॉफी देखील मिळणार आहे. एवढच काय संध्याकाळचा स्नॅक, डिनरदेखील मिळणार आहे. पाहुयात नेमकं या सुविधा काय आहेत आणि यासाठी कोणते नियम लागू आहेत ते.

ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना मिळणार फ्री जेवण अन् चहा/कॉफी; पाहा कोणत्या ट्रेनचा समावेश
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 2:04 PM

प्रवाशांसाठी आता एक गुड न्यूज आहे. जर तुमच्या ट्रेनला विलंब झाला तर तुम्हाला रेल्वेकडून मोफत जेवण आणि चहा/कॉफी देखील मिळणार आहे. एवढच काय संध्याकाळचा स्नॅक, डिनरदेखील मिळणार आहे.

असं बऱ्याचदा होतं की काही लांब पल्ल्याच्या रेल्वे उशिरानेच धावतात. त्यामुळे अशा रेल्वेचे वेळापत्रक हे कधीच वेळेवर नसतं. त्यामुळे या रेल्वेची तासंतास वाट पाहावी लागते. त्यामुळे नक्कीच प्रवाशांची तारांबळ होते. त्यावरचाच उपाय म्हणून रेल्वेने हा नियम काढला आहे.

रेल्वेकडून मोफत जेवण 

राजधानी, शताब्दी किंवा दुरांतो अशा गाड्या उशिराने धावत असतील तर प्रवाशांना जेवण मोफत मिळणार आहे. अशी तरतूद करण्यात आली आहे. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा स्नॅक, डिनर अशा विविध पर्यायांमधून प्रवासी निवडू शकतात.

काही अपघात किंवा हिवाळ्यात वातारनामुळे, किंवा पावसाळ्यातही गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होत असते. अनेकदा गाड्यांना खूप विलंब झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही अडचण कमी करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने खास व्यवस्था केली आहे.

जर राजधानी, शताब्दी किंवा दुरंतो एक्सप्रेस सारखी तुमची ट्रेन नियोजित वेळेपेक्षा दोन तास किंवा त्याहून अधिक विलंबाने आली तर आयआरसीटीसीच्या केटरिंग पॉलिसी अंतर्गत तुम्हाला मोफत जेवण मिळणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ प्रीमियम गाड्यांपुरतीच मर्यादित आहे.

चहा/कॉफी सेवा  फक्त जेवणच नाही तर चहा किंवा कॉफीही देणार आहेत. तसेच सोबतच बिस्किटं, साखर किंवा शुगर फ्री पॅकेट्स आणि मिल्क क्रीमर असतील.नाश्ता किंवा संध्याकाळचा चहा, चार ब्रेड स्लाइस (पांढरे किंवा तपकिरी), लोणी, ज्यूसही उपलब्ध असणार आहे.

दुपारचे किंवा रात्रीचे जेवणात काय मिळणार?

जेवणात पिवळी डाळ, राजमा किंवा चणे, लोणच्याची पाकिटे किंवा तांदळाबरोबर मिश्र भाजी आणि पुरीसोबत लोणच्याची पाकिटे यांचा समावेश असणार आहे.

तर तिकिटाचे संपूर्ण पैसे मिळणार परत…

जर ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त विलंबाने धावत असेल किंवा डायव्हर्ट केली असेल तर प्रवासी त्यांचे तिकीट रद्द करू शकतात आणि संपूर्ण परतावा मिळवू शकतात. ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांसाठी मूळ बुकिंग मोडद्वारे परतावा घेता येईल. काऊंटरवरून खरेदी केलेली तिकिटे रद्द करण्यासाठी स्टेशनवर जाऊन कॅश रिफंड तुम्ही घेऊ शकता.

तर अशापद्धतीने जरी तुमची रेल्वे उशिरा आली तरी तुमच्या जेवणाची गैरसोय होणार नाही याची काळजी नक्कीच रेल्वेने घेतली आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.