मुंबई नाही की शिमला नाही, 2024मध्ये या शहरात हॉटेलची सर्वाधिक बुकिंग; ‘या’ ठिकाणीही अनेकजण गेले

ओयोच्या नवीन अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भेटी मिळाल्या आहेत. पुरी, वाराणसी आणि हरिद्वार सर्वात लोकप्रिय ठिकाणे राहिली आहेत. हैदराबादने मुंबई आणि शिमलांना मागे टाकले आहे. छोट्या शहरांमध्येही पर्यटन वाढले असून, उत्तर प्रदेश सर्वात लोकप्रिय राज्य राहिले आहे. जयपूर, गोवा आणि पुदुचेरी ही पर्यटकांची आवडती ठिकाणे राहिली.

मुंबई नाही की शिमला नाही, 2024मध्ये या शहरात हॉटेलची सर्वाधिक बुकिंग; 'या' ठिकाणीही अनेकजण गेले
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 8:45 PM

अवघ्या काही दिवसात 2024 हे वर्ष संपणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. अनेकांचे फिरण्याचे प्लान तयार झाले आहेत. काही लोक घरीच कसं एन्जॉय करता येईल याचाही प्लान आखत आहेत. तर काही लोक बरोबर सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या प्रयत्नात आहेत. पण काही लोक असेही आहेत की, जे गेल्या वर्षाचा जमाखर्च मांडताना दिसत आहे. ओयोने नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी 2024मध्ये लोक सर्वाधिक कोणत्या ठिकाणी गेले याची यादी दिली आहे.

ओयो रुम्सच्या रिपोर्टनुसार, लोकांनी 2024मध्ये पुरी, वाराणासी आणि हरिद्वार या तीर्थस्थळांना सर्वाधिक भेटी दिल्या आहेत. तर मुंबई आणि शिमलापेक्षा हैदराबादला भेट देणं अधिक पसंत केलं आहे. या वर्षी हैदराबादमधील हॉटेलचं सर्वाधिक बुकिंग झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

धार्मिक स्थळांना अधिक भेटी

संपूर्ण वर्षात ओयोच्या प्लॅटफॉर्मवर कुणी कुणी बुकिंग केलं त्या आकड्यांच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार भारतात यंदाच्या वर्षी धार्मिक पर्यटनावर लोकांचा अधिक भर राहिला. लोकांनी सर्वाधिक पुरी, वाराणासी आणि हरिद्वारला भेट दिल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे अयोध्याला जाण्याकडे लोकांचा कल कमी असल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय देवघर, पलानी आणि गोवर्धन या ठिकाणीही भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आणि हॉटेल बुकिंग केल्याचं दिसून आलं आहे.

छोट्या शहरांची कमाल

ओयो रिपोर्टनुसार, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली आदी ठिकाणे हॉटेल बुकिंगमध्ये अव्वल राहिली आहेत. तर सर्वात लोकप्रिय राज्य म्हणून उत्तर प्रदेशने आपलं स्थान अव्वल ठेवलं आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकालाही नागरिकांनी मोठी पसंती दिल्याचं या अहवालातून दिसून आलं आहे. पटना, राजमुंदरी आणि हुबळीसारख्या छोट्या शहरातील हॉटेल बुकिंगमध्ये 40 टक्क्याची वार्षिक वाढ झाल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

यंदाच्या वर्षी सुट्टीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांसाठी जयपूर आकर्षणाचं केंद्र होतं. तर गोवा, पुदुचेरी आणि म्हैसूर आदी सदाबहार शहर सुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होतं. मात्र, मुंबई यंदा पर्यटकांच्या पसंतीला उतरली नसल्याचंही दिसून आलं आहे. प्रवाशांनी छोट्या शहरांसोबतच वेगळ्या शहरांनाही भेटी देण्यावर भर दिल्याचं यंदाच्या वर्षात आढळून आल्याचं सांगण्यात आलं.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.