International Self Care Day 2022 : जाणून घ्या ‘सेल्फ केअर डे’ का साजरा केला जातो? त्याचा इतिहास

International Self Care Day 2022 : स्वतः वर प्रेम करा. काळजी घ्या, वेळ काढा आपल्यासाठीच! जाणून घ्या, ‘सेल्फ केअर डे’ का साजरा केला जातो, त्याचा इतिहास आणि महत्त्व

International Self Care Day 2022 : जाणून घ्या ‘सेल्फ केअर डे’ का साजरा केला जातो? त्याचा इतिहास
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 4:06 PM

निरोगी जीवनशैलीसाठी (For a healthy lifestyle) स्वत: ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजकाल व्यस्त जीवनात तुम्ही स्वतःची काळजी घेण्यास दुर्लक्ष करतात. आपण प्रत्येक काम खूप मेहनत आणि वेळ देऊन करतो. पण, जेव्हा स्वतःची काळजी घ्यावी लागते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे नंतर अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यांनाही (Mental problems ) सामोरे जावे लागते. त्याचाही वाईट परिणाम आपल्या नात्यावर होतो. अशा स्थितीत स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीत तर, स्वत:ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हे आपल्याला निरोगी आणि आनंदी ठेवते. यासाठी दरवर्षी 24 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे (International Self Care Day) साजरा केला जातो. जाणून घ्या, या दिवसाचा उत्सव कधीपासून सुरू झाला आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे.

आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे 2022

24 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश स्वत: ची काळजी घेणे हा आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. या कारणास्तव, आंतरराष्ट्रीय सेल्फ-केअर फाऊंडेशनने 2011 मध्ये  हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ही यूके स्थित एक धर्मादाय संस्था आहे. या फाउंडेशनचा असा विश्वास आहे की, जेव्हा प्रत्येक व्यक्ती प्रथम स्वतःची काळजी घेते तेव्हा निरोगी समाजाची सुरुवात होते.

या दिवसाचे महत्त्व

कोविड-19 महामारीच्या काळात विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, आपल्याला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागली, यापुढे देखील अशीच काळजी घेणे काळाची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि स्वतःला निरोगी ठावा. त्यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होईल.

हे सुद्धा वाचा

अशी काळजी घ्या

नकारात्मकतेपासून दूर राहा, निसर्गाच्या जवळ जा, त्वचेची काळजी घ्या, योगासने करा, व्यायाम करा, निरोगी रहा, चांगली आणि गाढ झोप घ्या, जीवनाचा आनंद घ्या, आरोग्य तपासणी करा, पुस्तके वाचा आणि थोडा वेळ एकांतात घालवा.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.