Train Time Table | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! ‘या’ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी एकदा वेळा तपासा…

पश्चिम रेल्वेने ओखा-अर्नाकुलम ते ओखा-रामेश्वरम दरम्यान विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.

Train Time Table | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! ‘या’ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी एकदा वेळा तपासा...
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 2:55 PM

मुंबई : भारतीय रेल्वेने काही गाड्यांचे वेळापत्रक बदलून (railways revised train timing), आणखी काही नवीन गाड्या सुरू केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने ‘वलसाड-मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस’ (Valsad-Muzaffarpur Weekly Special Express) आणि ‘वांद्रे टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस’चे (BDTS-GKP Weekly Special Express) वेळापत्रक बदलले आहे. याव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेने ओखा-अर्नाकुलम ते ओखा-रामेश्वरम दरम्यान विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. 12 डिसेंबरपासून या रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू होणार आहे (Irctc indian railways revised some train timing know details).

या दोन ट्रेनच्या वेळापत्रकांमध्ये बदल

>> ट्रेन क्रमांक 05068 वांद्रे टर्मिनल-गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस : ट्रेन क्रमांक 05068 वांद्रे टर्मिनस-गोरखपूर स्पेशल एक्सप्रेस 18 डिसेंबर 2020 पासून वांद्रे टर्मिनस येथून, दर शुक्रवारी 00.20 वाजता सुटून, दुसर्‍या दिवशी गोरखपूरला 15.05 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 05067 गोरखपूर-वांद्रे टर्मिनस 16 डिसेंबर 2020 पासून, दर बुधवारी 05.30 वाजता गोरखपूरहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी वांद्रे टर्मिनसला 17.30 वाजता पोहोचेल. पश्चिम रेल्वेच्या सर्व थांब्यांसाठी रेल्वेच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे. या ट्रेन पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, वापी, भेस्तान आणि नंदुरबार या स्थानकांवर थांबतील (Irctc indian railways revised some train timing know details).

>> ट्रेन क्रमांक 09051/09052 वलसाड-मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस : ट्रेन क्रमांक 09051 वलसाड-मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस, 12 डिसेंबर 2020पासून, दर शनिवारी 22.15 वाजता वलसाडहून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 06.50 वाजता मुझफ्फरपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09052, 14 डिसेंबर 2020पासून दर सोमवारी मुझफ्फरपूर येथून 20.10 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी वलसाड येथे 07.10 वाजता पोहोचेल. या ट्रेनला जौनपूर जंक्शन येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे (Irctc indian railways revised some train timing know details).

139वर कॉल करा

उत्तर रेल्वेने असे सांगितले आहे की, प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेचे आगमन / प्रस्थान / थांबा इत्यादी संदर्भात माहितीसाठी 139वर फोन करावा. तसेच, रेल्वेची नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम (एनटीईएस) आणि भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या किंवा जवळच्या रेल्वे आरक्षण काउंटर / रेल्वे स्टेशनवर अधिकृत कर्मचार्‍यांकडून याबाबत योग्य माहिती मिळवावी.

सणांच्या निमित्ताने विशेष गाड्या

>> ट्रेन क्रमांक 06337/06338 ओखा-अर्नाकुलम-ओखा महोत्सव स्पेशल (द्वि-साप्ताहिक) : ट्रेन क्रमांक 06337/06338 ओखा-अर्नाकुलम द्वि-साप्ताहिक विशेष 14 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 दर सोमवारी आणि शनिवारी ओखा ते सुबर 06.45 येथे निघेल. त्याच दिवशी सकाळी 11.00 वाजता राजकोट येथे पोहोचेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 23.55 वाजता अर्नाकुलमला पोहोचेल. तर, परतीच्या वेळी ट्रेन क्रमांक 06388 अर्नाकुलम-ओखा स्पेशल ही गाडी अर्नाकुलमहून 11 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 दरम्यान दुपारी 20.25 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 11.19 वाजता राजकोटहून निघेल आणि सायंकाळी 16.40 वाजता ओखाला पोहोचेल (Irctc indian railways revised some train timing know details).

>> ट्रेन क्रमांक 06734/06733 ओखा-रामेश्वरम-ओखा महोत्सव स्पेशल (द्वि-साप्ताहिक) : ट्रेन क्रमांक 06734 ओखा-रामेश्वरम महोत्सव साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवारी, 15 डिसेंबर 2020 ते 29 डिसेंबर 2020 दरम्यान ओखा येथून सुबर येथे सकाळी 08.40 वाजता सुटेल. त्याच दुपारी 13.00 वाजता राजकोट, तर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 19.15 वाजता रामेश्वरमला पोहोचेल. परतीच्या वेळी ट्रेन क्रमांक 06733 रामेश्वरम-ओखा फेस्टिव्हल स्पेशल ही गाडी 11 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान दर शुक्रवारी रात्री 22.10 वाजता रामेश्वरमहून सुटेल आणि चौथ्या दिवशी पहाटे 05.15 वाजता राजकोट, तर सकाळी 10.20 वाजता ओखाला पोहोचेल.

12 डिसेंबरपासून तिकिटांचे बुकिंग सुरू…

ट्रेन क्रमांक 06337 ओखा-अर्नाकुलम आणि ट्रेन क्रमांक 06734 ओखा-रामेश्वरम फेस्टिव्हल विशेष गाड्यांचे आरक्षण 12 डिसेंबरपासून रेल्वे आरक्षण काउंटर व आयआरसीटीसी येथे सुरू होईल. वरील सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित ठेवल्या जातील.

(Irctc indian railways revised some train timing know details)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.