‘जोडीदार’ आणि ‘तुमच्या’ वयात जास्त अंतर आहे? मग ‘असे’ हाताळा तुमचे नाते.. कधीच निर्माण होणार नाहीत समस्या
लग्नानंतर जोडीदाराच्या वयातील अंतर त्यांच्यात दुरावा निर्माण करते. परंतु, मुळ समस्या वयातील अंतर नव्हे तर, नातेसंबध हाताळण्याची पद्धती असते. वयातील अंतर जास्त असले तरीही आपण योग्य प्रकारे नाते सांभाळले तर, वादविवाद होणार नाहीत.
लग्नाचा निर्णय आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणतो, त्यामुळे तो घेताना योग्य विचार करणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा लोक त्यांच्या इच्छेनुसार किंवा मजबुरीने त्यांच्या वयापेक्षा कमी किंवा जास्त (More or less than age) असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. वयातील अंतरामुळे नात्यात समस्या (Relationship problems) निर्माण होऊ शकतात. जोपर्यंत असे नाते नवीन असते, तोपर्यंत गोष्टी स्थिर राहतात, पण काळाच्या ओघात समस्या निर्माण होऊ लागतात. वयाच्या या अंतरामुळे अनेक, दाम्पत्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. लोकांना असे वाटते की याचे कारण वयाचे अंतर आहे, परंतु तसे अजिबात नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने नातेसंबंध हाताळत आहात ती चुकीची पद्धत आहे. जुन्या काळात, बहुतेक प्रकरणांमध्ये, लग्न झालेल्या लोकांमधील वयाचे अंतर जास्त असायचे. परंतु, तेव्हा जोडीदार आपसात चांगल्या पद्धतीने जुळवून घेत होते. वयातील हे अंतर नातेसंबंधात सकारात्मकता (Positivity in relationships) आणू शकते, तुम्हाला ते योग्य मार्गांनी हाताळावे लागेल.
समजुतदारपणा दाखवा
तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या वयातील अंतर जास्त आहे, त्यामुळे तुम्ही या स्थितीत नाते अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकता. जर तुम्ही नातेसंबंधात मोठे असाल, तर तुम्ही या स्थितीत परिपक्वपणे म्हणजेच समुतदारपणे वागले पाहिजे. जोडीदाराने नात्यात हुशारीने वागले तर ते नाते हाताळणे सोपे होते.
एकमेकांचा आदर करा
नात्यात प्रेम आणि विश्वास असेल, पण आदराचा अभाव असेल तर नक्कीच नात्यात अडचणी येणार हे निश्चित. जोडीदार तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल, पण त्यालाही तुमच्याइतकाच आदर दिला जातो. वयाने तरुण असल्याने तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी गैरवर्तन करण्याचा किंवा त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा अधिकार मिळत नाही. आदर दिल्याने आदर मिळतो, तुमच्यामुळे तुमच्या जोडीदाराचा स्वाभिमान दुखावणार नाही याबाबच नेहमी प्रयत्नशील रहा.
वैयक्तिक स्पेस द्या
अनेक वेळा वयाच्या अंतरामुळे लोक रिलेशनशिपमध्ये स्वतःची धावपळ सुरू करतात. ते त्यांच्या जोडीदारासोबत सर्वत्र जातात, जेणेकरून ते त्याला प्रत्येक निर्णयात मदत करू शकतील. तुमची ही पद्धत त्यांना केवळ स्वावलंबी होण्यापासून रोखत नाही तर त्यांची वैयक्तिक स्पेसही नष्ट करत आहे. जेव्हा असे होते तेव्हा नात्यात घुसमट होण्यास सुरूवात होते आणि समस्या निर्माण होऊ लागतात. जोडीदाराला त्याच्या मित्रांना भेटू द्या किंवा त्याला बाहेर एकट्याने जाऊ द्या.