मुंबई : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी माता सीतेची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवसाला ‘जानकी जयंती’, ‘सीता जयंती’ आणि ‘सीता अष्टमी’ या नावांनी ओळखले जाते. असे मानले जाते की या दिवशी माता सीता प्रकट झाल्या होत्या. यावेळी ‘सीता अष्टमी’ 6 मार्च 2021 रोजी येणार आहे. असा विश्वास आहे की, ज्या कुमारी मुली सीता अष्टमीला व्रत ठेवतात, त्यांच्या लग्नातील अडथळे निघून जातात आणि त्यांना इच्छित वर मिळतात (Janaki Jayanti 2021 special vrat vidhi and remedies for removing obstacles of marriage).
याशिवाय ‘जानकी जयंती’चे व्रत सवाष्ण महिलांसाठीही विशेष मानले जाते. हे ठेवल्यास त्यांच्या विवाहित जीवनातील सगळे कष्ट संपतात. तसेच, पतीला दीर्घा आयुष्य मिळते. तुमच्या घरातही मुलीच्या लग्नात अडचणी असल्यास किंवा वैवाहिक जीवन सुखी नसल्यास ‘जानकी जयंती’च्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास या समस्येपासून मुक्ती मिळू शकेल.
– वैवाहिक जीवनात समस्या असल्यास सीता अष्टमीच्या दिवशी जोडीने भगवान राम आणि माता सीतेची पूजा करावी. सीता मातेला सात वेळा सिंदूर लावावा आणि प्रत्येक वेळी ते माता सीतेला लावल्यानंतर आपल्या स्वत:च्या कपाळावर देखील लावा.
– राम आणि सीता माता यांचे नाते खूप दृढ होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि एकमेकांप्रति आदर होता, म्हणूनच त्यांच्या जोडीला एक आदर्श जोडपे म्हणतात. तुमच्या घरातही संकटे येत असतील, तर घरात राम-सीतेचा फोटो ठेवून, या दिवशी त्याची पूजा करा (Janaki Jayanti 2021 special vrat vidhi and remedies for removing obstacles of marriage).
– या दिवशी, गंगा नदीजवळची किंवा तुळशी जवळची माती घेऊन, माता सीता आणि भगवान राम यांची एक प्रतिमा तयार करा. ज्या मुलींचे लग्न जुळत नाहीये, त्यांनी या प्रतिमांची पूजा करा. नंतर माता सीतेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा. यानंतर, चांगल्या आणि इच्छित वरासाठी प्रार्थना करा.
– जर तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर सीता अष्टमीच्या दिवशी ‘ओम जानकी रामभ्याम नमः’ या मंत्राचा जप रूद्राक्षाच्या माळेने करावा. आपण हा मंत्र एक, पाच, सात, अकरा किंवा एकवीस वेळा जप करू शकता.
या उपाययोजनांशिवाय आपल्याला या दिवशी पूर्णवेळ उपवास ठेवावा लागेल. संध्याकाळची पूजा आणि आरती झाल्यानंतर तुम्ही एका वेळचे जेवण घेऊ शकता. जर शारीरिकदृष्ट्या उपास ठेवण्यास असक्षम असल्यास, दिवसभरात एखाद-दुसरे फळ सेवन केले जाऊ शकते.
(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)
(Janaki Jayanti 2021 special vrat vidhi and remedies for removing obstacles of marriage)
पूजा-पाठ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, घरात नांदेल सुख-समृद्धी!
Vastu Tips | चुकूनही ‘या’ दिशेला डोके करून झोपू नका, जाणून घ्या झोपण्याच्या योग्य पद्धती…
Vastu Tips | वास्तु दोष आणि राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करेल ‘मीठ’, वाचा काय कराल?#Salt | #VastuTips | #VastuDosha | #SaltBenefitshttps://t.co/i0c8gix3TI
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021