वर्षातून फक्त 15 दिवसच उपलब्ध असणारी भाजी म्हणजे शाकाहाऱ्यांचं चिकन-मटणच; ब्लड शुगरवर तर रामबाण
शाकाहारप्रेमींसाठी देखील एक भाजी आहे जिला शाकाहाऱ्यांचं चिकन-मटण म्हणतात. कारण त्या भाजीची चव ही अगदी चिकन-मटणासारखी लागते. शिवाय ही भाजी वर्षातून फक्त 15 ते 20 दिवसच उपलब्ध असते त्यामुळे या भाजीला प्रचंड प्रमाणात मागणी असते.
2024ला निरोप देताना अनेकजण न्यू इअरच्या पार्टीची तयारी करत आहेत. अनेकांच्या प्लॅनमध्ये शक्यतो नॉनवेज हे असतच. त्यामुळे चिकन, मटणावर ताव मारण्यासाठी नॉनवेजप्रेमी सज्जच असतात. पण शाकाहारप्रेमींचे तसे नसते. पण तुम्हाला माहितीये का की शाकाहारप्रेमींसाठी देखील एक भाजी आहे जिला शाकाहाऱ्यांचं चिकन-मटण म्हणतात. कारण त्या भाजीची चव ही अगदी चिकन-मटणासारखी लागते.
शाकाहाऱ्यांचं चिकन-मटण
आता शाकाहाऱ्यांचं चिकन-मटण म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर सुरणाची भाजी, सोयाबीन, मासवडी, पनीर हे असे पदार्थ आले असतील. आणि याही पदार्थांना शाकाहाऱ्यांचं नॉनवेज म्हणतात. पण एक भाजी अशी आहे जी खरोखरच चवीच्या बाबतीत चिकन, मटणाला तोड देते, असं म्हणतात. आणि मुख्य म्हणजे ही भाजी वर्षातून फक्त 15 दिवसच बाजारात उपलब्ध असते. त्या भाजीचं नाव आहे करटुल्याची भाजी किंवा काहीजण त्याला कटुलेही म्हणतात.
वर्षातून 15 ते 20 दिवसच भाजी उपलब्ध
कटुरलेची भाजी कारल्यासाखी दिसते. ही भाजी वर्षातून जेमतेम 15 ते 20 दिवसच उपलब्ध असते आणि महागही मिळते. तरीही लोक आवडीनं खरेदी करतात.कटुरले किंवा करटोली अशा विविध नावांनी या रानभाजीला ओळखलं जातं. दिसायला ती कारल्याच्या कुटुंबातलीच दिसते. तिलाही बारिकसे काटेही असतात.
विशेष म्हणजे ही भाजी उगवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं खत किंवा औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता नसते. पूर्णपणे नैसर्गिकरित्या ही भाजी उगवता येते. ही भाजी प्रामुख्यानं पावसाळ्यात उगवते.
ब्लड शुगरपासून ते अशक्तपणा, अनेक आजारांवर गुणकारी
कटुरलेची भाजी आरोग्यासाठी प्रचंड गुणकारी मानली जाते. अनेकजण वर्षभर या भाजीची आतुरतेनं वाट पाहतात. श्रावणात मांसाहार न करू शकणाऱ्या मांसाहारप्रेमी देखील या भाजीचे फॅन आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे कटुरले भाजी कारल्याशी मिळतीजुळती आहे.
या भाजीत भरपूर आयर्न आणि प्रोटीन असतात. या भाजीतून शरिराला मांसाहाराएवढे पोषक तत्त्व मिळतात. यामुळे जुलाब, कावीळ, इत्यादी आजारांवर आराम मिळू शकतो. एवढच काय तर ब्लड शुगर कंट्रोल राहण्यासही मदत मिळते. तसंच अशक्तपणा असेल तर तोही दूर होतो.
(डिस्क्लेमर: इथं दिलेली माहिती उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)