Valentines Day 2023 : व्हॅलेंटाईन वीकमध्ये मिळालेले गिफ्ट योग्य दिशेने ठेवा, नाते मजबूत होईल
ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तरच प्रेम जीवनात आनंद मिळतो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये व्हॅलेंटाईन डेची सुरुवात "रोज डे"ने होते. ज्योतिषी आरती दहिया यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिळालेल्या भेटवस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे सांगितलं आहे.
मुंबई : फेब्रुवारी (february) महिन्याला प्रेमाचा महिना असं अनेकजण म्हणतात. कारण सगळीकडे हवेत हवेत प्रेमाचा (Valentines Week 2023) गंध दरवळत असतो. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमाबद्दल अनेकजण उत्सुक असतात. प्रेम जोडीदार आणि जोडप्यांसाठी व्हॅलेंटाईन डे (Valentine day) खूप खास असतो. प्रेम ही एक अनोखी भावना आहे, ती भावना व्यक्त करण्यासाठी अनेकजण चांगली ठिकाणं किंवा आवडीची ठिकाणं निवडतात. या वर्षी व्हॅलेंटाईन वीकमध्ये मिळालेले गिफ्ट योग्य दिशेने ठेवा, नाते मजबूत होईल.
ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तरच प्रेम जीवनात आनंद मिळतो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये व्हॅलेंटाईन डेची सुरुवात “रोज डे”ने होते. ज्योतिषी आरती दहिया यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिळालेल्या भेटवस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे सांगितलं आहे.
गिफ्ट कोणत्या दिशेने ठेवायला हवं
- व्हॅलेंटाईन वीकमध्ये भेटवस्तू देणं हा प्रकार सगळीकडे पाहायला मिळतो. या दिवशी कपल एकमेकांना गिफ्ट देतात. पण तुम्हाला माहित आहे का ? तुम्हाला मिळालेलं गिफ्ट योग्य दिशेने ठेवलं तर तुमचं नातं अधिक मजबूत होतं.
- यावर्षी तुमच्या जोडीदाराने तुम्हाला दिलेलं गिफ्ट उत्तर पूर्व या दिशेने ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होणार आहे.
- तुम्हाला तुमचं लव्ह रिलेशन अधिक मजबूत करायचं असल्यास नैऋत्य दिशेला लव्ह बर्ड्स ठेवा, तेही पांढऱ्या रंगात ठेवा
- समजा तुमच्यात तणावाची स्थिती निर्माण होत असेल, तर एक गोलाकार पांढरा कागद कापून त्यावर तुमचे नाव आणि तुमच्या जोडीदाराचे नाव लाल रंगात लिहा आणि लव्ह बर्डच्या खाली चिटकवा.
- यावर्षी तुम्ही तुमच्या जोडीदाराला परफ्यूम गिफ्ट केलं तर तुमचं रिलेशन अधिक मजबूत राहणार आहे.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update