तुमच्या प्रिय मित्रापासूनही या गोष्टी लपवून ठेवा, अन्यथा तुम्हाला भोगावे लागू शकते मोठे नुकसान
आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामुळे अनेकांना चाणक्य नीतीच्या मार्गदर्शनाने आयुष्यात प्रगतीपथावर जाणयासाठी खूप महत्वाचे ठरले आहेत. चाणक्य नीती मार्ग हे आपल्याला संकटातून, वाईट मार्गातून बाहेर काढते आणि त्यामुळे तुम्ही अधिक यशस्वी होऊ शकता.
आचार्य चाणक्य यांची तुलना जगातील महान विद्वानांशी केली जाते. त्यांनी आपल्या जीवनानुभवावर आधारित चाणक्य नीती लिहिली. यात त्यांनी धर्म, अर्थ आणि कर्तव्य तसेच जीवनातील विविध महत्त्वाची धोरणे समजावून सांगितली आहेत. तसेच आचार्य चाणक्य यांनीही ज्ञानी व्यक्तीसाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच बरोबर त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथही रचला, ज्यात राजकारण, युद्ध आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, जो माणसाला योग्य दिशेने चालण्यासाठी मार्गदर्शन करतो. आचार्य चाणक्य यांचे चाणक्य नीती हे पुस्तक आजही तरुणाईला मार्गदर्शन करत आहे. असे म्हटले जाते की जो या पुस्तकाचे अनुसरण करतो त्याला जीवनात नेहमीच यश आणि सन्मान मिळतो. या पुस्तकात त्यांनी त्या लोकांबद्दलही सांगितले आहे, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुमच्या गोष्टी लोकांशी कशा शेअर कराव्यात. चला तर मग जाणून घेऊया आपण कोणत्या गोष्टी इतर कोणाशीही शेअर करू नयेत.
या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत.
न विश्वसेत्कुमित्रे च मित्रे चापि न विश्वसेत्। कदाचित्कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत् ।।
या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, कुमित्रावर कधीही विश्वास ठेवू नये. याशिवाय तुमच्या मित्रावर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये कारण तुम्ही ज्या मित्रावर विश्वास ठेऊन तुमचं गुपित सांगितलं आहे तोच मित्र एखाद्या दिवशी रागाच्या भरात तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचे गुपित रहस्य इतरांना सांगू शकतो. या कारणास्तव तुम्ही तुमचे रहस्य नेहमीच लपवून ठेवले पाहिजे.
मनसा चिन्तितं कार्यं वाचा नैव प्रकाशयेत्। मन्त्रेण रक्षयेद् गूढं कार्य चापि नियोजयेत् ।
या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की जोपर्यंत तुम्ही ठरवलेलं ते काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या कामाबद्दल तोंडातून कोणतीच गोष्ट काढू नये. ते नेहमी गुप्त मंत्राप्रमाणे जपले पाहिजे. तुमच्या महत्वाच्या ठरवलेल्या कामाबद्दल इतर व्यक्तींना कोणतीच माहिती नसावी. अशा प्रकारे केलेले काम माणसाला नेहमी यशस्वी बनवते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)