Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन गिझर खरेदी करत असाल तर ‘हे’ फीचर एकदा तपासा, स्फोट होण्यापासून होईल बचाव

तुम्ही जर गीझर विकत घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्षात ठेवा. गिझर खरेदी केलात तर गिझरचा स्फोट होणार नाही याची खात्री करण्यासाठी ही वैशिष्ट्ये तपासली पाहिजेत. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

नवीन गिझर खरेदी करत असाल तर 'हे' फीचर एकदा तपासा, स्फोट होण्यापासून होईल बचाव
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 7:52 PM

आपण अनेकदा ऐकलं असेलच की गिझर स्फोटाच्या अनेक घटना घडत आहेत. यात अनेकदा छोट्याश्या निष्काळजीपणामुळे कधी तांत्रिक अडचण येतात. आणि दुर्घटना घडतात. अशावेळी जेव्हा गिझर विकत घ्यायला जाता तेव्हा या गोष्टी लक्षात घेऊन हे फीचर तपासून पाहणं गरजेचं आहे. या फीचरच्या माध्यमातून अनेकांनी जर गिझर विकत घेतला तर स्फोट होण्याच्या घटना कमी होऊ शकतात. यामुळे गिझरचा स्फोट होण्यापासून बचाव होईल. तुम्हालाही गिझर खरेदी करताना हे फिचर एकदा तपासा. गिझर खरेदी करताना लक्षात ठेवा

जर तुम्ही गिझर खरेदी करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम आपल्याला गिझरकशासाठी आवश्यक आहे आणि ते किती वापरले जाते. इन्स्टंट गीझर, स्टोरेज गीझर आणि गॅस गीझर असे तीन प्रकारचे गिझर बाजारात उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्हाला हवं असलेले गिझर खरेदी करा.

तुमच्या घरात जिथे गरम पाण्याची गरज कमी असते किंवा नळ उघडताच गिझरमधून गरम पाणी हवे असते तिथे इन्स्टंट गिझरचा वापर केला जातो. हे गिझर बहुतांश स्वयंपाकघरात बसवले जातात, त्यामुळे नळ उघडताच जर गरम पाणी येत असेल या विचाराने तुम्ही जर ते बाथरूममध्ये बसवत असला तर ते धोकादायक आहे. कारण हे गिझर तितकेसे नीट चालत नाहीत.

हे सुद्धा वाचा

आपल्यातील बहुतेक लोकांना आंघोळीच्या वेळी अमर्याद गरम पाण्याची आवश्यकता असते तेथे गॅस गीझर लावला जातो. त्यात झटपट गरम पाणी मिळते, व यात गॅसचा सिलिंडर बसवला जातो. त्यामुळं ते थोडं स्वस्तही आहे. हे गीझर उच्च इलेक्ट्रिक गीझरपेक्षा किंचित कमी सुरक्षित आहे. त्यामुळे गॅस गीझर नेहमी बाथरूमच्या बाहेर ठेवला जातो.

गिझरचे हे आहे आवश्यक वैशिष्ट्य

जर तुमच्या घरात दोनच लोक असतील तर तुम्ही 10 लिटरचे गीझर लावू शकता. जर तुमच्याकडे तीन लोक असतील तर तुम्हाला 15 लिटरचं गीझर बाथरूमध्ये लावू शकता, 4-5 लोकांचं कुटुंब असेल तर 20 ते 25 लिटरचं गिझर बाजारात मिळते ते तुम्ही लावू शकता. इलेक्ट्रिक गीझरमध्ये देण्यात आलेल्या हीटिंग एलिमेंटची किमान 2 वर्षांची वॉरंटी असावी. त्यामागे ISI स्टॅम्प असावा हे लक्षात ठेवा.

पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा.
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा.
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर.
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर.
वनविभागाचं खोक्याच्या घरावर बुलडोझर, दमानियांकडून खंत; '...चूक काय'
वनविभागाचं खोक्याच्या घरावर बुलडोझर, दमानियांकडून खंत; '...चूक काय'.
'आमच्याकडे या, आम्ही...', एकनाथ शिंदे अन् दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर
'आमच्याकडे या, आम्ही...', एकनाथ शिंदे अन् दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर.
अमोल मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? कोणी केली मागणी?
अमोल मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? कोणी केली मागणी?.
'खोक्या'च्या घरावर सरकारी बुल्डोझर, आता पुढचा हिशेब पोलीस कोठडीत होणार
'खोक्या'च्या घरावर सरकारी बुल्डोझर, आता पुढचा हिशेब पोलीस कोठडीत होणार.
जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत येणार? राज्यात राजकीय भूकंप होणार?
जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत येणार? राज्यात राजकीय भूकंप होणार?.
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.