कुठं जाता बाहेर खायला? घरच्या घरीच बनवा झणझणीत अफगाणी चिकन; संपूर्ण रेसिपी वाचा
रोजच्या कंटाळवाण्या जेवणापासून सुटका मिळवा आणि ही उत्तम अफगाणी चिकन रेसिपी ट्राय करा. सोप्या पद्धतीने बनवता येणारे हे चिकन मसालेदार आणि चवदार आहे. तांदळाच्या भाकरीसोबत हे चिकन खूपच चांगले लागते. या रेसिपीमध्ये साहित्याची यादी आणि स्टेप-बाय-स्टेप पद्धत स्पष्ट केलेली आहे. घरातील पाहुण्यांसाठी किंवा स्वतःसाठी ही एक उत्तम निवड आहे.
रोज तेच तेच जेवण करून आपल्याला कंटाळा येत असतो. काही तरी झक्कास, झणझणीत खायला हवं असतं. जीभही असा झणझणीत पदार्थ खाण्यासाठी असूसलेली असते. चिकन, मच्छी, मटण, भाज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून नेहमीच खात असतो. पण तरीही मन भरत नाही. काही लोक तर हटके आणि काही तरी वेगळं खाण्यासाठी मैल न् मैल दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून जातात. ज्या ठिकाणी उत्तम पदार्थ मिळतात अशा ठिकाणांच्या शोधात असतात. त्यामुळेच तुम्हाला आम्ही आता एक चिकन रेसिपी सांगणार आहोत. घरी आलेल्या पाहुण्यांना ही रेसिपी खाऊ घातली तर तेही खूश होतीलच. पण तुम्हालाही वेगळं काही बनवल्याचा आनंद होईल. अफगाणी चिकन बनवायला आज आपण शिकणार आहोत. अस्सल अफगाणी चिकन बनवून पाहाच एकदा.
अफगानी चिकन बनवण्यासाठीचे साहित्य :
चिकन – 1 किलो
कांदा – 2
हिरवी मिरच्या – 4
आले – छोटा तुकडा
लसूण – 3 पाकळ्या
कोशिंबीर – एक जुडी
दही – 1 कप
फ्रेश क्रीम – 3 टेबल स्पून
मिरी पावडर – 1 टेबल स्पून
गरम मसाला – 1 टीस्पून
कसूरी मेथी – ½ टीस्पून
मीठ – चवीप्रमाणे
सनफ्लॉवर तेल – 4 टेबल स्पून
अशी बनवा रेसिपी :
अफगानी चिकन तयार करण्यासाठी, कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण, कोशिंबीर दिलेल्या प्रमाणात चांगल्या बारीक कूटून घ्या. स्वच्छ करून, धुऊन ठेवलेल्या चिकनमध्ये हा तयार केलेला मसाला घाला. त्यात दही, फ्रेश क्रीम, मिरी पावडर, गरम मसाला, कासूरी मेथी आणि मीठ घालून चांगलंसं मिश्रण करून एक तासासाठी ठेवून द्या, म्हणजे मसाला चिकनला चांगला लागेल. नंतर, एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून, चिकन तळून घ्या. चिकन तळून झाल्यावर, तळलेले चिकन त्याच पॅनमध्ये ठेऊन, मसाल्याचं पाणी आणि थोडं पाणी घालून, पॅन झाकून 10 मिनिटं शिजवून घ्या. नंतर, चिकन एक सर्विंग बाऊलमध्ये काढा आणि तुमचं अफगानी चिकन तयार आहे.
अफगानी चिकन सोबत खाण्यासाठी तांदळाची भाकरी तयार करा:
साहित्य:
तांदळाचे पीठ – ½ किलो
पाणी – 4 ग्लास
मीठ – चवीप्रमाणे
तेल – 3 टेबल स्पून
तयार करण्याची पद्धत:
पाणी उकळल्यावर त्यात मीठ आणि तेल घाला. पाणी उकळून झाल्यावर, त्यात तांदळाचं पीठ घालून चांगलं शिजवून घ्या. कणीक पूर्ण शिजली की, ती थोडी गुळगुळीत करून, छोटे गोळे करून, तवा किंवा कडक पाट्यावर ठेऊन, त्यांना तळून घ्या.