Carom Seeds | ओव्याच्या लहान-लहान दाण्यांमध्ये मोठे औषधी गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे!

ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. (Health Benefits of Carom Seeds)

Carom Seeds | ओव्याच्या लहान-लहान दाण्यांमध्ये मोठे औषधी गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे!
ओवा
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 1:51 PM

मुंबई : ओवा (Carom Seeds) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि किंचित तुरट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. कारण त्यामुळे पदार्थ रुचकर होतात आणि पाचनही सुरळीत राहते (Amazing Health benefits of Carom Seeds aka Ajwain).

भारतात महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी ओव्याचे पिक घेतले जाते. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असणे फारच गरजेचे आहे. कारण ओव्यामुळे अनेक आरोग्य समस्या घरच्या घरीच कमी करता येतात. प्राचीन काळापासून ओवा आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. यासाठीच जाणून घेऊया ओवा खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

– पोटदुखी, गॅस, अपचन झाल्यास ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग घालून खाल्ले जाते. वास्तविक, ओव्यामध्ये थायमोल नावाचे एक कंपाऊंड, अँटीस्पास्मोडिक आणि कॅमेनिटिव गुणधर्म असतात, जे पोटातील वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करतात (Amazing Health benefits of Carom Seeds aka Ajwain).

ओव्याचे फायदे :

– ज्या लोकांना दम्याचा आजार आहे, त्यांनी दिवसातून कमीत कमी एक चमचे ओवा खायला हवा. ओव्यामध्ये शरीरातील पेशींचा दाह कमी करणारे अँटी-इन्फ्लेमेशन गुणधर्म आहेत. यामुळे, आपल्याला श्वसन समस्येमध्ये आराम मिळेल.

– संधिवातामुळे वेदना होत असल्यास, ओव्याची पुरचुंडी तयार करून त्या भागावर शेक द्या. अर्धा कप पाण्यात ओवा उकळवा आणि त्यात सुंठ मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे संधिवातात खूप आराम मिळेल.

– ओवा भूक नियंत्रित करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यासाठी, एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्रभर भिजवा. सकाळी हे पाणी उकळवून त्यात मध घालून चहाप्रमाणे प्या.

– जर मायग्रेनमुळे वेदना होत असतील, तर ओव्याची पावडर एका पातळ कपड्यात बांधून तिचा सतत वास घेतल्याने वेदनेपासून आराम मिळेल (Amazing Health benefits of Carom Seeds aka Ajwain).

– काही लोकांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात. ओवा केस अकाली पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे नियमित सेवन केल्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाहीत.

– ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होत असेल, त्यांच्यासाठी ओवा ही एक अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. अशावेळी ओवा पाण्यात उकळवा आणि तो प्या, किंवा कोमट पाण्यात एक चमचा ओवा घालून त्याचे सेवन करा.

– ओवा मुरूमं दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी पाण्यात ओवा मिसळून पेस्ट बनवा आणि मुरुमांच्या जागी 10 ते 15 मिनिटे लावा. यामुळे त्वचेच्या आत अडकलेल्या धुळीपासून मुक्त होण्यास आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Amazing Health benefits of Carom Seeds aka Ajwain)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.