आवळ्याचा रस प्यायल्याने होतात चमत्कारिक फायदे, फक्त 15 दिवस प्या अन्… 

आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करण्यास देखील आवळा फायदेशीर आहे.

आवळ्याचा रस प्यायल्याने होतात चमत्कारिक फायदे, फक्त 15 दिवस प्या अन्... 
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 8:35 AM

आवळ्याला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. आवळ्याचा रस तुमच्या आरोग्याला अनेक चमत्कारी फायदे देऊ शकतो. जर तुम्ही आवळ्याचा रस 15 दिवस नियमित प्यायला, तर त्याचे परिणाम चांगले येतील. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि तुमच्या दिनचर्येत नवीन ऊर्जा जोडू शकते. आवळ्याच्या चमत्कारी गुणधर्मांचा फायदा घेण्यासाठी त्याचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

जाणून घेऊया आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे…..

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हे सर्दी, खोकला आणि संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

पचनसंस्था सुधारते : आवळ्याचा रस पचनसंस्था सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि गॅससारख्या पोटाच्या समस्या यामुळे दूर होतात. आवळ्यामध्ये असलेले फायबर तुमचे आतडे स्वच्छ ठेवते.

केस आणि त्वचेसाठी वरदान : आवळ्याचा रसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वे केस मजबूत दाट आणि चमकदार बनवतात. हे केस गळणे आणि पांढरे होणे टाळण्यास मदत करते. तसेच आवळ्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि सुरकुत्या देखील कमी होतात.

वजन कमी करण्यास फायदेशीर : जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आवळा ज्यूस हा एक उत्तम पर्याय आहे. हे चयापच गतिमान करते आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकते. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

हृदय निरोगी ठेवते : आवळा रक्ताभिसरण सुधारतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयविकारांचा धोका कमी होतो.

दृष्टी : आवळ्याचा रस डोळ्यांसाठी ही फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅरोटीन दृष्टी तीक्ष्ण करते आणि डोळ्यांशी संबंधित समस्या जसे की मोतीबिंदू आणि डोळ्यांचा ताण कमी करते.

यकृत स्वच्छ करते : आवळ्याचा रस यकृत डिटॉक्सिफाय करतो आणि ते निरोगी ठेवतो. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

मेंदू सक्रिय ठेवतो : आवळा मानसिक आरोग्यासाठी ही उत्तम आहे. यामुळे मेंदू सतेज राहतो स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.