फायद्यांसोबतच लसणाचे नुकसानही आहेत, तुम्हाला माहितीये का..?

लसूण (Garlic) हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात असले तरी ते खाण्याचे अनेक दुष्परिणाम (Side Effects) आहेत. लसणामुळे डोकेदुखी, अपचन, तोंडाची दुर्गंध आदी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जाणून घ्या लसूण खाण्याचे हे नुकसान...

फायद्यांसोबतच लसणाचे नुकसानही आहेत, तुम्हाला माहितीये का..?
लसूण
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 10:46 AM

आतापर्यंत आपण लसूण खाण्याचे फायदे अनेकांकडून एकले असतील. परंतु लसणाचे जसे फायदे आहेत तसे नुकसानदेखील (Side effects of Garlic) मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना काळात लसणाचा आहारात वापर करावा, त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) वाढत असल्याचे सल्ले अनेकांकडून देण्यात येत होते. आपल्या रोजच्या आहारात लसणाचा मोठ्या प्रमाणावर वापरदेखील होत असतो. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात लसणाचा वापर होत असतो. लसणामध्ये ‘अॅलिसिन’ असते आणि ते एक औषधी आहे, ज्यात अँटी-व्हायरल, (anti-viral), अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट आहे. यासोबतच त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड हेदेखील विशेष प्रमाणात आढळते. या सर्व घटकांमुळे लसणाची चव तिखट असते व वासही तीव्र येतो.

1) डोकेदुखीची समस्या

तुम्हाला आधीच डोकेदुखीची समस्या असेल आणि त्याच वेळी तुम्ही लसणाचे सेवन केले तर तुमची डोकेदुखी आणखी वाढू शकते. बर्‍याच वेळा असे होते की डोकेदुखीच्या वेळी लोक घरगुती उपचारांसाठी लसूण औषध म्हणून खातात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे फायद्याऐवजी नुकसान अधिक होऊ शकते, त्यामुळे अशा परिस्थितीत लसणाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

2) अॅसिडिटीची समस्या

ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण जास्त न खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटाची समस्या असूनही लसणाचे सेवन केले तर त्याला अॅसिडिटीचा सामना करावा लागू शकतो. अॅसिडिटीची समस्या फार काळ पाठलाग सोडत नाही, असे म्हणतात. काहीवेळा, यापासून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याची देखील आवश्यकता असते.

3) श्वासाची दुर्घंधी

तोंडाच्या दुर्गंधीने त्रस्त असलेल्यांनी लसूण खाणे टाळावे. लसूण तोंडातून येणारा वास आणखीनच वाढवू शकतो, त्यामुळे त्यापासून दूर राहणे चांगले. श्वासाच्या दुर्गंधीमुळे अनेकदा कमीपणाच्या भावनेला सामोरे जावे लागत असते. अनेक घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळू शकत नाही, त्यातच लसणाचा वापर केल्यास समस्या अधिक वाढू शकते.

4) अॅलर्जी असल्यास लसूण टाळा

लसणात सल्फरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे ते अॅलर्जीचे कारण बनते. त्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारची अॅलर्जीची समस्या आहे, त्यांनीही लसणाचे सेवन टाळावे. असे म्हटले जाते, की ज्या लोकांना लसूण जास्त प्रमाणात खाणे आवडते, त्यांना देखील अॅलर्जीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. लसूणचा आहरात योग्य मर्यादेत वापर योग्य असतो.

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत

Brinjal | नियमित आहारामध्ये वांगं वापरत असाल तर पच्छाताप होण्याआधीच काही गोष्टी जाणून घ्या!

तुमच्याद्वारे सुद्धा चुकून खाल्ले जात आहे प्लास्टिक? जाणून घ्याल तर घ्याल काळजी!!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.